Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

आमदार राजेशदादा पाडवी यांचा वाढदिवस न भूतो, सर्व पक्षीय, धर्मीय, लोकोत्सवाच्या धर्तीवर साजरा,हजारोंची उपस्थिती

तळोदा दि ६ ( प्रतिनिधी) शहादा - तळोदा विधानसभा मतदार संघाचे आमदार राजेश पाडवी यांचा वाढदिवस  सर्वपक्षीय नेते ,समाज मंडळे,व्यापारी सर्व स्तरातील नागरिक, हितचिंतक, ठेकेदार, सर्व धर्मीय नेतेमंडळी,कार्यकर्ते व सामान्य नागरिकांची शुभेच्छांसाठी अक्षरशः दिवसभर रांगा होत्या.कार्यक्रमासाठी आमदारांचे मित्र सिनेअभिनेते शरदजी केळकरांची उपस्थिती सर्वांचे आकर्षणाचा केंद्रबिंदू होता.
           दिवसभरात कार्यकर्त्यांच्या वतीने अनेक सामाजिक उपक्रमही पार पडले. यंदाच्या वाढदिवसाला कार्यकर्त्यांच्या वतीने सकाळी आमदारांची लाडू तुला व पेढा तुला करून सदरचे लाडू व पेडे सर्वाना वाटण्यात आले. 
      दि ५ रोजी सकाळपासूनच आमदारांच्या सोमावल येथील निवासस्थानी शुभेच्छा देणाऱ्यांची रीघ लागली असल्याने या परिसराला दिवसभर यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते, रात्री उशीरापर्यंत गर्दी सुरूच होती,          दिवसभरात विविध ठिकाणी आमदारांना आमंत्रित करून वाढदिवसानिमित्त त्यांचा भव्य सत्कार करत , केक  कापण्यात आलेत. 
          आमदारांच्या वाढदिवसानिमित्त राज्य पातळीवरील सर्वपक्षीय नेते मंडळी तसेच जिल्हाभरातील नेते मंडळी, लोकप्रतिनिधी, सर्व शासकीय अधिकारी आदींनी उपस्थित होऊन तर,परदेशातुनही भ्रमणध्वनी द्वारे आमदारांना शुभेच्छा दिल्या. जिल्हाभरातील अनेक लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष सोमावल येथे येऊन आमदारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, आमदारांच्या वाढदिवसानिमित्त हितचिंतक व कार्यकर्ते आणि समाज बांधवांच्या शुभेच्छांचे फलक संपूर्ण शहर झळकत होते. कार्यकर्ते दिवसभर आमदारांच्या निवासस्थानी दिसून आलें. माजी मंत्री पद्माकर वळवी, आमदार आमश्या पाडवी, खा.हिना गावित, डॉ विजय कुमार गावित,माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, डॉ कांतीलाल टाटीया,डॉ शशिकांत वाणी यांच्यासह मित्र पक्षाचे लोकप्रतिनिधी उपस्थित असल्याने पक्ष विरहीत संबंध घट्ट असल्याचे चित्र यानिमित्ताने दिसून आले.दिवसभर संगीत, रात्री रोषणाई ची आतिषबाजी करण्यात आली.
            प्रामुख्याने धुळ्याचे माजी महापौर प्रदीप कर्पे, माजी नगराध्यक्ष अजय परदेशी, शहर अध्यक्ष गौरव वाणी, गुड्डू वळवी, प्रकाश भारती,जगदीश परदेशी, योगेश पाडवी, योगेश चौधरी, किरण सुर्यवंशी, शिरीष माळी, अँड दिपक जयस्वाल,हेमराज पवार, बळीराम पाडवी, प स उपसभापती विजय राजपुत, जितेंद्र माळी,नारायण ठाकरे, विरसिंग पाडवी, प्रकाश वळवी, प्रा.विलास डामरे, हेमलाल मगरे,सुभाष चौधरी, सुभाष जैन, राजेश भोई, प्रकाश भारती,इंजि जितेंद्र कलाल, शैलेंद्र इंद्रजित,प्रविणसिह राजपूत,अक्षय जोहरी, तालुक्यातील सर्व पत्रकार सरपंच, पुढारी विविध पक्षाचे नेते, कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी दिवसभर उत्साह संचारला होता.