Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

शौर्य बहूउद्देशीय संस्थेचा उपक्रम गरजू विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी मार्गदर्शन पुस्तकांचे मोफत वितरण

शौर्य बहूउद्देशीय संस्थेचा उपक्रम गरजू विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी मार्गदर्शन पुस्तकांचे मोफत वितरण
मुंबई दि ६ (प्रतिनिधी) गरीब व गरजु विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व मोफत पुस्तके वाटप हे बौद्धिक दातृत्व आहे, यामुळे समाजात भ्रष्टाचारमुक्त अधिकारी निपजतील असा विश्वास काशिनाथ चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त,गुन्हे शाखा यांनी व्यक्त केला.
         शौर्य बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्यावतीने चेंबूर एज्युकेशन सोसायटी,चेंबूर हायस्कूल येथील विवेकानंद सभागृहात प्रमुख वक्ते काशिनाथ चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त,गुन्हे शाखा, मनिषा शालन,बबनराव सुपुगडे,आर.एस.पी.अधिकारी तथा शारीरिक शिक्षक,कोल्हापूर यांच्या उपस्थितीत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत पुस्तके वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

           यावेळी संस्थेमार्फत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच पुस्तक खरेदीसाठी आर्थिक योगदान दिले.शौर्य संस्थेचे अध्यक्ष किरण साळवे हे शाळेचे चेंबूर हायस्कूल रात्र शाळेचे माजी विद्यार्थी असल्याने अध्यक्षा भूषणा पाठारे व विश्वस्त चंदू पाठारे चेंबूर हायस्कूलच्या पदाधिका-यांनी कल्याणकारी सामाजिक उपक्रमांना सभागृह निःशुल्क उपलब्ध करून दिले.     
      कार्यक्रमासाठी  महेश कुंडव,नितीश पाटील,  के.डी.पाटील,गणेश राठोड,गोविंद मोरे, विनोद साडविलकर यांनी परीश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद साडविलकर यांनी केले.तसेच पुस्तके, सभागृह इ.गोष्टी उपलब्ध करून दिल्याबद्दल किरण साळवे यांनी मान्यवरांचे कृतज्ञतापूर्वक आभार मानले.