Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

भरतभाई माळी अध्यापक शिक्षण मंडळ संचलित आर्ट्स व कॉमर्स कॉलेज ट्रस्टच्या अध्यक्षपदी निवड,

तळोदा दि ४ (प्रतिनिधी)अध्यापक शिक्षण मंडळ संचलित आर्ट्स व कॉमर्स कॉलेज ट्रस्ट तळोदा येथील कार्यकारी मंडळाची सभा संपन्न
            अध्यापक शिक्षण मंडळ संचलित आर्ट्स व कॉमर्स कॉलेज ट्रस्ट तळोदा येथील कार्यकारी मंडळाची सभा दिनांक ४ ऑगस्ट २०२४ वार रविवार रोजी कॉलेज च्या मुख्य इमारतीत सकाळी ठीक ११.०० वाजता संपन्न झाली.
  या सभेत सर्वप्रथम कॉलेज ट्रस्टचे अध्यक्ष म्हणून भरत बबनराव माळी यांची सर्वानुमते अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. त्यानंतर उपस्थित सदस्यांच्या व कार्यकारी मंडळांच्या संमतीने शहादा- तळोदा मतदार संघाचे आमदार राजेश पाडवी यांची कॉलेज ट्रस्टच्या स्वीकृत सदस्य पदी निवड करण्यात आली.
  या सभेत सर्वप्रथम उपस्थित सर्व सदस्यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर सभेच्या कामकाजास सुरुवात करण्यात आली त्यामध्ये कॉलेज ट्रस्टचे अध्यक्ष म्हणून  भरत बबनराव माळी यांची सर्वांमध्ये निवड करण्यात आली. त्यानंतर उपस्थित सर्व सदस्यांच्या समक्ष कार्यकारी मंडळाच्या वतीने शहादा- तळोदा मतदार संघाचे आमदार राजेश पाडवी यांची कार्यकारी मंडळाच्या स्वीकृत सदस्य म्हणून सर्वानुमते निवड करण्यात आली हे या सभेचे प्रमुख वैशिष्ट्य ठरले सदस्य म्हणून गोविंद पुरुषोत्तम पाटील, अनिल पुंडलिक माळी,उखा गणपत पिंपरे, अरविंद हिरालाल माळी, विलास भिकाजी सूर्यवंशी, नंदूगिर सहदेवगिर गोसावी, दत्तात्रय काशिनाथ पाटील, रोहित भरत माळी, सुनील श्रीराम कर्णकार, मुकेशचंद्र विश्वनाथ कलाल, चेतनकुमार वासुदेव पवार हे उपस्थित होते. तर प्रमुखदाते या प्रवर्गातून नरेंद्रभाई भगवानभाई पटेल, हेमंत नटवरलाल चौधरी, अशोक सुदाम पटेल यांची प्रतिनिधी सदस्य म्हणून नावे घेण्यात आली.
 यानंतर आमदार राजेश पाडवी यांची कॉलेज ट्रस्टच्या स्वीकृत सदस्य म्हणून निवड झाल्याने कॉलेज ट्रस्टचे अध्यक्ष भरतभाई माळी यांच्या सूचनेनुसार सर्व पदाधिकारी व सदस्यांच्या वतीने लक्ष्मण बबनराव माळी यांनी आमदार राजेश पाडवी यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला यानंतर आमदार राजेश पाडवी यांनी  भरतभाई माळी यांची कॉलेज ट्रस्टच्या अध्यक्षपदी निवड झाल्याने त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा ही दिल्या.
      या सभेत भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारणी सदस्य डॉ. शशिकांत वाणी यांनी सदिच्छा भेट दिली त्यामुळे त्यांचाही सन्मान श्री भरतभाईंच्या वतीने करण्यात आला.एकंदरीत सभा ही खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.