येथील संत सावता माळी युवा मंच तर्फे आज रविवारी (ता. ४) रोजी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. शिबिरात २१८ दात्यांनी रक्तदान करुन सदर शिबिर यशस्वी केले. हे या रक्तदान शिबिराचे सलग नऊवे वर्ष आहे.
श्री. संत शिरोमणी सावता माळी यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून येथील श्री. संत सावता माळी युवा मंच यांच्या वतीने येथील संत सावता माळी भवनात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरात माळी समाज बांधवांबरोबरच ईतर समाज बांधवांनी देखील मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदविला. शिबिरात यावेळी अनेक पती-पत्नीचा जोडप्यांनी तसेच दोन दिव्यांग नागरिकांनी देखील रक्तदान केले. रक्त संकलित करण्यासाठी धुळे येथील नवजीवन ब्लड बँकचे डॉ. सुनील चौधरी, रक्तपेढी तंत्रज्ञ दिलीप जाधव, कैलास पाटील, पांडुरंग गवळी, चंद्रकांत दंडगव्हाण, गजानन चौधरी, शिवम गवळी तसेच नंदुरबार येथील जन कल्याण ब्लड बँकचे डॉ. राजेश केसवाणी, आकाश जैन, खलील काजी, शेखर पाटील, तेजस पाटील, गोरख भिल, संदीप वळवी, मनीषा पावरा आदींनी परिश्रम घेतले. सदर रक्तदान शिबिराला आमदार राजेश पाडवी यांनी भेट देवून पाच हजार रुपयांची देणगी दिली.
सदर रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी माळी समाज बांधवांनी विशेषतः युवकांनी तसेच माळी समाज पंच मंडळ, माळी समाज महिला मंडळ, श्री. संत सावता माळी युवा मंचच्या सर्व युवकांनी परिश्रम घेतले.
चौकट
नऊ वर्षात २ हजार २२७ दात्यांचे रक्तदान -
येथील श्री. संत सावता माळी युवा मंचाकडून २०१५ पासून दरवर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत असून पहिल्या वर्षी २२३ दात्यांनी, २०१६ मध्ये २९४ दात्यांनी, २०१७ मध्ये ३३६ दात्यांनी, २०१८ मध्ये ३०३ दात्यांनी, २०१९ मध्ये २८६ दात्यांनी, २०२१ मध्ये १११ दात्यांनी, २०२२ मध्ये २४० दात्यांनी, २०२३ मध्ये २१६ दात्यांनी तर यावर्षी २१८ दात्यांनी रक्तदान केले. श्री. संत सावता माळी युवा मंचाकडून आयोजित रक्तदान शिबिरात गेल्या नऊ वर्षात तब्बल २ हजार २२७ दात्यांनी रक्तदान केले आहे.