तळोदा दि ५ (प्रतिनिधी) कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ संलग्नित महात्मा फुले समाजकार्य महाविद्यालय अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना दत्तक गाव ढवळीवीहीर येथे नुकतेच शिव्या मुक्त समाज या अभियानाचे शुभारंभ करण्यात आला .
या अंतर्गत जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शिव्या मुक्त समाज निर्मितीसाठी शपथ देण्यात आली यात प्रामुख्याने संविधान मूल्यांचा आणि मूलभूत कर्तव्यांची पालन कसे करावे त्याच बरोबर जात धर्म परभाषा प्रांत व लिंग यावरून कोणत्याही भेदभाव न करता सर्व व्यक्तींचा आदर करावा त्याचबरोबर देशाच्या व समृद्ध संस्कृतीचा अभिमान कसा बाळगावा व संस्कृत समाजासाठी आणि लिंगभाव समानते साठी प्रयत्नशील कसे राहावे यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
यासाठी समाजकार्य महाविद्यालयाचे विद्यार्थी पूनम पवार, सरला पानपाटील, पूजाबेन चौधरी, सोनाली पावरा, विक्रांत भोई, प्रदीप वसावे, मनीष पाटील, शाळेचे मुख्याध्यापक सोनवणे, ग्रामपंचायत संघटनेचे अध्यक्ष दारासिंग वसावे, आदींनी परीश्रम घेतले व शपथ मध्ये सहभाग नोदवला कार्यक्रमाचे नियोजन रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा रामचंद्र परदेशी यांनी केले