तळोदा दि ९(प्रतिनिधी) कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव संलग्नित महात्मा फुले समाजकार्य महाविद्यालय तळोदेचे राष्ट्रीय सेवा योजना एककच्या माध्यमाने आज 9 ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिवस निमित्त आदिवासी समाज यांचे प्रथा आणि परंपरा यांचे प्रत्यक्ष सादरीकरण करण्यात आले.
महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी यांनी पारंपारिक वेशभूषा धारण करून समाजामध्ये असलेल्या प्रचलित नृत्य प्रकार हा सादर करून दाखवला यात विद्यार्थिनींनी पारंपारिक पद्धतीने आदिवासी महिलांची असलेली वेशभूषा परिधान केली होती त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी उपस्थित लोकांसमोर आदिवासींच्या चळवळीतील गीत सादर करून नृत्य सादर केले.
यावेळेस मोठ्या प्रमाणात विद्यार्थी व विद्यार्थिनी तसेच आदिवासी समाज बांधव आणि विविध सामाजिक संघटना यांच्या सहभाग या ठिकाणी दिसून आला सदर कार्यक्रमाचे नियोजन हे बिरसा मुंडा चौक येथे करण्यात आले यात समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य उषा भीमसिंग वसावे यांच्या मार्गदर्शनाखाली रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा रामचंद्र परदेशी सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा निलेश गायकवाड विद्यार्थी विकास अधिकारी नितीन तायडे माजी रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा डॉ प्रमोद जाधव आणि विद्यार्थी उपस्थित होते विविध आदिवासी सामाजिक संघटनेने सहकार्य केले