तळोदा दि २५ राष्ट्रीय सेवा योजनेमुळे (एनएसएस) विद्यार्थ्यांना स्वयंशिस्त लागते तसेच श्रमाचे महत्व देखील कळते. त्यामुळे एनएसएसचे विद्यार्थी कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होतात तसेच विद्यार्थी हे आहे त्या परिस्थितीत, वेगवेगळ्या पद्धतीने समाजाची सेवा करू शकतात. एनएसएसच्या विद्यार्थ्यांची पर्यावरण, स्वच्छता, आरोग्य, आपत्ती आदींमध्ये महत्वाची भूमिका असते असे प्रतिपादन माजी प्राचार्य डॉ. एस. आर. मगरे यांनी केले.
येथील प्राचार्य भाईसाहेब गो. हु. महाजन न्यू हायस्कुल व श्री शि. ल. माळी विज्ञान व कला कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेचा स्थापना दिवसानिमित व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचा अध्यक्षस्थानी प्राचार्य अमरदीप महाजन होते. प्रमुख वक्ते म्हणून माजी प्राचार्य डॉ. एस. आर. मगरे उपस्थित होते. याप्रसंगी विद्यालयाचे पर्यवेक्षक ए. एल. महाजन, विज्ञान विभाग प्रमुख नितीन शिंपी, कला विभाग प्रमुख संदिप मगरे आदी उपस्थित होते. याप्रसंगी एनएसएसच्या विद्यार्थिनींनी एका तालासुरात एनएसएसचे गीत गायन केले.
डॉ. मगरे यांनी पुढे आपल्या मनोगतात एनएसएस मधील आपल्या सेवा काळातील काम करीत असतानाचे आपले विविध अनुभव विद्यार्थ्यांपुढे कथन केले. आणि एनएसएसचे बोधचिन्ह व बोधवाक्य 'नॉट मी बट यू' याविषयी सविस्तर माहिती दिली.यावेळी प्राचार्य अमरदीप महाजन यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात विद्यार्थ्यांना एनएसएसचे महत्व समजावून सांगतांना विविध उदाहरणे दिलीत. एनएसएसमुळे विद्यार्थ्यांच्या सुप्त कालागुणांचे वाव मिळतो, त्यांच्या सर्वांगीण विकास होतो असे सांगून सर्वांनी समाजाची व देशाची सेवा करण्याच्या जास्तीत जास्त प्रयत्न करावा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी एच. पी. चौधरी यांनी सूत्रसंचालन केले. एम. ए. राणे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी एनएसएसचे कार्यक्रम अधिकारी सुशील मगरे, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी किरण सूर्यवंशी तसेच विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदींनी परिश्रम घेतल