Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

जी टी पाटील महाविद्यालयात हिंदी सप्ताहाचे आयोजन कार्यक्रमातून हिंदी भाषेचा प्रचार आणि प्रसार

जी  टी पाटील महाविद्यालयात हिंदी सप्ताहाचे आयोजन कार्यक्रमातून हिंदी भाषेचा प्रचार आणि प्रसार 

नंदुरबार दि २५ (प्रतिनिधी) येथील जी टी पाटील महाविद्यालयात हिंदी सप्ताहाच्या  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य तथा कबचौ उमवी व्यवस्थापन परिषद सदस्य  डॉ. एम. जे. रघुवंशी तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे नं.ता.वी. समितीचे समन्वयक डॉ. एम. एस. रघुवंशी होते. 
         त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की भारतात सर्वाधिक बोलली जाणारी भाषा ही हिंदी आहे. भारतत सर्वाधिक  55% लोक हे हिंदीचा वापर आपल्या दैनंदी व्यवहारी जीवनामध्ये करतात. म्हणूनच हिंदी ही आपल्या देशाची  राष्ट्रभाषा आहे. 14 सप्टेंबर 1949 या दिवशी संविधानातील धारा 343 नुसार हिंदीला राजभाषा  व राष्ट्रभाषाचा दर्जा  प्राप्त झाला आहे. तरी हिंदीला समृद्ध बनवण्यासाठी हिंदीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावे असे आवाहन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. जे. रघुवंशी यांनी विद्यार्थ्यांना अध्यक्षीय समारोप प्रसंगी सप्ताहाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमातील पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले तसेच आपण पुढे देखील हिंदीच्या विकासासाठी कटिबद्ध व्हा असे आव्हान केले.भाषेचा विकास हा आपल्या बोलल्या जाणाऱ्या शब्दातून होत असतो, अनेक भाषांमधून एक भाषेचं निर्मिती होत असते असे सांगून खडीबोली या भाषेतून हिंदीची निर्मिती झाली असे प्रतिपादन केले. तत्पूर्वी कार्यक्रमाची प्रस्तावना डॉ. जी. एस. ठाकरे यांनी केले. नंतर हिंदी विषय गीत कांती वसावे आणि कल्पना पाडवी यांनी सादर केले. यानंतर सदर सप्ताहा मध्ये घेण्यात आलेल्या सामान्य विज्ञान परीक्षेमध्ये, वकृत्व स्पर्धेमध्ये ,कविता वाचन व देवनागरी भाषेमध्ये सही करण्याच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या त्यात प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. सदर कार्यक्रमाचा सूत्रसंचालन डॉ. व्ही. एम. मक्रणी तर आभार प्रकट प्रा. एस. डी. वाडेकर यांनी केले. सदर कार्यक्रमाला उपप्राचार्य प्रा. एस. यू. पाटील, डॉ. संदीप पाटील व कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. टी. जी. पाटील उपस्थित होते.   कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. एस. के. ठाकरे, प्रा. एस. डी . घाटे, प्रा. श्याम पवार, प्रा. वंदना पवार, प्रा. एन. आर. कोडपकर  व प्रा. एम. एस. शेख यांनी परिश्रम घेतले. सदर कार्यक्रमाला विद्यार्थी  मोठ्या संख्येने उपस्थित होते.