सातपुडा मिरर न्युज नेटवर्क दि १४
शौर्य बहुउद्देशीय सेवाभावी संस्था तर्फे संस्थापक अध्यक्ष किरण साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली चेंबूर एज्युकेशन सोसायटी शाळा चेंबूर पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी डोळे तपासणी शिबिराचे आयोजन केले शिबिरात एकूण ६०० विद्यार्थ्यांची डोळे तपासणी करण्यात आली.
KBHB eye &Ert Hospital यांच्या डॉक्टरने मुलांच्या डोळ्याचे विकार व नंबर्स तथा चष्मे बद्दल तपासणी करून रिपोर्ट दिले, सदर शिबिरास चेंबूर एज्युकेशन सोसायटी या मान्यवर अध्यक्षा श्रीमती भूषणा पठारे, मुख्याध्यापक विठ्ठल कांबळे, प्राथमिक विभागाच्या मुलांचे सहकार्य लाभले, तसेच KBHB चॅरिटेबल हॉस्पिटल, परेल मुंबई, वरिष्ठ मॅनेजर अशोक गायकवाड यांचे सहकार्य व मार्गदर्शनाने शिबिराचे नियोजन उत्तम रित्या पार पडले 
सदर शिबिरास समाजसेवक रुग्ण मित्र विनोद साडविलकर यांनी कार्यक्रमास उपस्थित राहून मार्गदर्शन व उपक्रमाचे कौतुक केले. डॉ छाया भटनागर समाजसेविका यांनी कार्यक्रमास उपस्थित लावून कार्यक्रमास सहभाग नोंदवला.
SABIK मिशन फॉर व्हिजन च्या डॉ. गौरांगी ptom मॅडम,पूजा कांबळे, स्नेहल तांबरे, सेजल अंभोरे, यांनी तपासणीचे कार्य उत्तम प्रकारे केले
शौर्य बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व KBHB हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने डोळे तपासणीचा प्रकल्प राबविण्यात आला.