Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

नंदूरबार येथे १३ किलो ८६ ग्रॅम किंमतीचा दोन लाख एकसष्ट हजार रुपये किंमती सुका गांजा जप्त पोलिसात गुन्हा दाखल

तळोदा दि १८(प्रतिनिधी) नंदूरबार बसस्थानकावर एक इसम उंबराच्या झाडाखाली बेकायदेशिर रित्या सुका गांजा कब्जात बाळगताना मिळाला त्याचा सोबत माल कि. १३.०८६ कि. ग्रॅ. किंमत २,६१,७२०/- रु.पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे 
         अरुण तिलकचंद पाडवी (अलुनकुमार त्रिलोचण महाराणा) वय ३९ मूळ, रा. हाथीबंद पो. चतुरांजली ता. सुक्रोली जि. मयूरभंज ओरीसा ह.मु. कोराई खापर ता.अ.कुवा जि. नंदुरबार आरोपीत मजकुर हा नंदुरबार शहरातील बस स्थानक परिसरात पार्सल ऑफिसच्या समोर उमराच्या झाडाखाली बेकायदेशिर रित्या सुका गांजा कब्जात बाळगुन तिची चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने मिळून आला म्हणून नंदुरबार पोलिसात पोशि अभय शशिकांत राजपुत स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा नंदुरबार यांच्या फिर्यादीवरून गुंगीकारक औषधी द्रव्य व मनोव्यापार विर परिणाम करणारे पदार्थ अधि. १९८५ चे कलम ८ (क), २०,२२ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे 
पो. ठाणे प्रभारी अधिकारी पोनि सुनिल भाबड, तपास पोउनि तानाजी बहिरम करीत आहे.