Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

मतदान जनजागृती साठी भगवान रेस्टॉरंट मार्फत १० टक्के सूट....


नंदुरबार : मतदान जनजागृती साठी मतदारांना येथील भगवान रेस्टॉरंट मार्फत मतदान केल्यानंतर बोटाची शाई दाखवून १० टक्के सूट देण्यात येणार असून त्या संदर्भात फलक लावण्यात आला आहे अशी माहिती रेस्टॉरंटची संचालक तथा नंदुरबार हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष बळवंत जाधव यांनी दिली आहे. 
   विधानसभा निवडणुकीत नंदुरबार जिल्ह्यात मतदानाच्या टक्का वाढवावा यासाठी प्रशासनासोबत विविध सामाजिक संघटना व संस्था तसेच व्यावसायिकांनी पुढाकार घेतला आहे. 

        येथील जुनी भतवाल टॉकीज परिसरातील सत्तर वर्षाची परंपरा असलेल्या भगवान रेस्टॉरंट मार्फत मतदारांनी मतदान करून बोटाची शाई दाखविल्यास दहा टक्के सूट फरसाण व खाद्यपदार्थांवर दिली आहे. मतदार जनजागृतीसाठी प्रशासनात हातभार लावण्याचा त्यांच्या हा प्रयत्न आहे त्यांच्या जनजागृती अभियानामार्फत मतदानाची टक्केवारी वाढविण्यास मदत होईल त्यांनी सवलतीच्या फलक देखील रेस्टॉरंट बाहेर लावलेला आहे. यासोबत आलेल्या प्रत्येक ग्राहकाला व सोशल मीडियाच्या माध्यमातून ते मतदार जनजागृती करीत आहे.