Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

अनंत ज्ञानदीप आश्रम शाळा कोठार येथे संविधान दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन


तळोदा दि २७ (प्रतिनिधी) तालुक्यातील कोठार येथील श्री साईनाथ शिक्षण संस्था संचलित अनंत ज्ञानदीप प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळेत संविधान दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राथमिक मुख्याध्यापक ज्ञानेश्वर पाटील होते. 
          प्रमुख मार्गदर्शक म्हणून माध्यमिक मुख्याध्यापक जयवंत मराठे,हंसराज महाले, जितेंद्र चौधरी,हरी भारती,निता गुरव यांनी विद्यार्थ्यांना संविधान या विषयावर मार्गदर्शन केले. दरम्यान सुरुवातीला संविधान दिनानिमित्त सामूहिक संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले.संविधान प्रास्ताविका लेखन स्पर्धा घेण्यात आली,आपले भारतीय संविधान'या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.समारोप प्रसंगी विद्यार्थ्यांना संविधानाच्या प्रास्ताविकांच्या प्रती वितरित करण्यात आल्या.
          कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
शाळेत संविधान मंच स्थापना
   एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या मार्गदर्शक सूचनानुसार कोठार आश्रमशाळेत संविधान म्हणजे स्थापना करण्यात आली आहे. संविधान म्हणजे समितीचे अध्यक्ष म्हणून ज्ञानेश्वर पाटील यांची निवड करण्यात आली तर संविधान मंच समितीमध्ये माध्यमिक मुख्याध्यापक जयवंत मराठे,हंसराज महाले, जयेश कोळी, संदीप पाठक,अनिता पावरा, सुरेश पाडवी,लक्ष्मण पावरा,आदींची निवड करण्यात आली आहे.संविधान मंच अंतर्गत शाळेत विविध संविधान जनजागृती चे कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत.