मनोहर महाजन यांना समाजरत्न पुरस्कार
नंदुरबार, दि. २९ न्याहली (ता. नंदुरबार) येथील सामाजिक कार्यकर्ते मनोहर महाजन यांना त्यांच्या सामाजिक कार्याच्या योगदानाबद्दल समाजरत्न पुरस्कार देऊन सुरत येथे गौरविण्यात आले.
सुरत येथील लिंबायत निलगिरी परिसरात असलेल्या शांती नगरातील विश्व शांतिदूत महाबोधी बुद्ध विहारमथ्ये ७५ वा संविधान दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दर्दी सेवा समितीचे अध्यक्ष तथा विहारचे संस्थापक अध्यक्ष सुभाष झाडे होते. या प्रसंगी न्याहली येथील सामाजिक कार्यकर्ते मनोहर महाजन यांना त्यांच्या सामाजिक कार्याच्या योगदानाबद्दल समाज रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी भारतीय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (बी.ए) गुजरात प्रदेश संगठक दिलीप शिरसाठ, उपप्रमुख गौतम इंगळे, बामसेफचे प्रभारी सुभाष धुरंधर, विक्रम वानखेडे, शिक्षिका कल्पना पाटील, रत्ना माळी, विकास कोष्टी, महिला उपासिका संघ, उपासक संघ, श्री आय. जी. इंग्लिश अकॅडमीचे अशोक दास आणि विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष सुभाष झाडे यांनी उपस्थित मान्यवर व विद्यार्थ्यांना भारतीय संविधानाची प्रत आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा भेट दिली. तसेच विद्यार्थ्यांना संविधान वाचण्यासाठी प्रेरित केले.