Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

कोल्हापुरात येथे ८ डिसेंबरला एक दिवसीय गझल संमेलन

कोल्हापुरात  येथे ८ डिसेंबरला
 एक दिवसीय गझल संमेलन

         नंदुरबार, (प्रतिनिधी) महाराष्ट्रातील नामांकित गझल मंथन साहित्य संस्था, कोरपना, या संस्थेच्या वतीने रविवार दि. ८ डिसेंबर, २०२४ रोजी एक दिवसीय गझल संमेलनाचे आयोजन सोमवारपेठ, पन्हाळा येथील संजीवन अभियांत्रिकी महाविद्यालयात करण्यात आलेले आहे.
     या संमेलनाचे अध्यक्षपद सुप्रसिद्ध गझलकारा डॉ. स्नेहल कुलकर्णी, (गारगोटी) या भूषविणार आहेत. या कार्यक्रमाचे उद्घाटन सुप्रसिद्ध गझलकार एजाज शेख, (अकोला) करतील. ख्यातनाम गझलकार डॉ. शिवाजी काळे (राशीन) यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार्‍या या संमेलनाचे स्वागताध्यक्ष संजीवनचे सहसचिव प्रा. एन. आर. भोसले असतील. प्रमुख अतिथी म्हणून जालना येथील ख्यातनाम गझलकार राज रणधीर हे उपस्थित राहणार आहेत.

या संमेलनात डॉ. स्नेहल कुलकर्णी यांच्या 'दिशांतर' या दुसऱ्या गझलसंग्रहाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.
   
   या संमेलनाचे नियोजन गझल मंथन साहित्य संस्था कोल्हापूर विभाग अध्यक्ष सचिन इनामदार व सांगली जिल्हा कार्यकारिणीने केले आहे.

      या गझल संमेलनासाठी कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी या जिल्ह्यातील गझलकारांना सहभागी करण्यात येत असून महाराष्ट्रातील नामवंत गझलकार व गझलकारा यांच्या गझल मुशायऱ्यांची मेजवानी गझल रसिकांना मिळणार आहे. तरी सर्व गझलकार, रसिकांनी या गझल मुशायऱ्याला उपस्थित राहून कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन गझल मंथन साहित्य संस्थेचे अध्यक्ष अनिल कांबळे, सचिव जयवंत वानखेडे, उपाध्यक्ष देवकुमार, सहसचिव उमा पाटील, कोषाध्यक्ष प्रशांत रामगिरवार, प्रसिद्धी विभाग प्रमुख भरत माळी यांनी केले आहे.
___________________________
 *गझल मंथन साहित्य संस्था*