Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

'घर बाईचे, दार पुरुषाचे' हे सनातनी विचार नाकारले पाहिजे सत्यशोधक अधिवेशनात चर्चासत्र

'घर बाईचे, दार पुरुषाचे' हे सनातनी विचार नाकारले पाहिजे

 सत्यशोधक अधिवेशनात तळोदेकरांची उपस्थिती
 अहिल्यानगर पुरोहितशाहीकडून शेकडो वर्षे बहुजनांचे शोषण होत असून, आपण ब्राह्मणी कुटुंबाची व्यवस्था मोडीत काढली पाहिजे, 'घर बाईचे आणि दार पुरुषाचे' हे सनातनी विचार नाकारले पाहिजेत, असे मत ज्येष्ठ विचारवंत प्रा. प्रतिमा परदेशी यांनी व्यक्त केले.

अहिल्यानगर येथे सत्यशोधक समाजाचे दोन दिवसीय अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. दुसऱ्या दिवशी 'महिलांची वर्तमानस्थिती सत्यशोधकीय आकलन' या विषयावर आयोजित चर्चासत्रामध्ये प्रा प्रतिमा परदेशी ध्यक्षस्थानी होत्या. यावेळी नागपूर येथील ज्येष्ठ पत्रकार नागेश चौधरी यांना दीनमित्रकार मुकुंदराव पाटील उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार देण्यात आला.

चर्चासत्रात बोलताना नाशिक येथील जयश्री बागूल म्हणाल्या की, स्त्रियांनी प्रथम अंधश्रद्धा सोडल्या पाहिजेत. सत्यशोधक समाजाने स्त्रियाबरोबर तृतीयपंथी समाजाच्या प्रश्नांकडेही तितक्याच डोळसपणे पाहिले पाहिजे, असे मत व्यक्त केले.

मुंबई येथील स्त्री अभ्यासक डॉ.
वंदना महाजन यांनी स्त्रियांच्या सध्याच्या मूलभूत प्रश्नांबाबत विचार व्यक्त केले. जे समाजाचे प्रश्न असतात तेच प्रश्न महिलांचे असतात. महात्मा फुले हे स्त्री, शूद्र व अतिशूद्र यांचा समान पातळीवर विचार करतात. आजचे स्त्रियांचे प्रश्न महात्मा फुले यांच्या विचाराने पुढे नेले पाहिजे. स्त्रीची जात बदलली की त्यांच्या समस्या बदलतात, अशा पद्धतीची मांडणी वंदना महाजन यांनी केली. या चर्चासत्राचे प्रास्ताविक निकिता जाधव यांनी केले तर आभार संध्या मेढे यांनी मानले.
कार्यक्रमाला तळोदाहुन  डॉ देविदास शेंडे, माळी समाज पंच मंडळ अध्यक्ष अनिल पुंडलिक माळी, उपाध्यक्ष,विजय बारकू माळी,मित्तलकुमार टवाळे,नथ्थू काशिनाथ पिंपरे,माजी नगरसेवक पंकज राणे ,अजित टवाळे ,कापुरे आप्पा 
नितीन लक्ष्मण मगरे 

महिला मंडळाच्या अध्यक्षा मंगलाबाई राणे,अनिता शेंडे ,भारती शेंडे ,रत्नाबाई पिंपरे,प्रितीताई राणे,ममता मगरे,रजनीबाई राणे 
शर्मिलाताई मगरे,मंगलाबाई टवाळे उपस्थित होते