Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

जामिया संचलित मौलाना अबुल कलाम ज्यू.कॉलेज, अक्कलकुवा येथे जामिया संस्था व हैद्राबाद आर्टी फिशियल इंटेलिजन्स ( AI) वर कार्यशाळा संपन्न

अक्क्लकुवा दि ५ (प्रतिनिधी)जामिया संचलित मौलाना अबुल कलाम ज्यू.कॉलेज, अक्कलकुवा येथे जामिया संस्था व हैद्राबाद येथील एआय बडी यांच्या वतीने आर्टी फिशियल इंटेलिजन्स ( AI) वर कार्यशाळा आयोजित करण्यात आली. 
     कार्यशाळेत हैद्राबाद येथील एक्स्पर्ट सय्यद शाबाज, सय्यद अदनान, मो.अ.हमीद यांनी अमूल्य मार्गदर्शन केले. कार्यशाळेत AI चे महत्व व त्याचे आपल्या अभ्यासक्रमात उपयोग कसे करावे याचे प्रॅक्टिकल स्क्रीन वर दाखवून विद्यार्थ्यांना करिअर च्या नवीन संधी समजावण्यात आले. AI ही जगभरात प्रसिध्द असलेली टेकनॉलॉजि आहे.नवीन विकसित होत असलेल्या तंत्रज्ञाना च्या उदया मुळे अधिक तंत्रज्ञान व्यावसायिक AI करिअर कडे आकर्षित होत आहे.
सदर कार्यशाळेत कनिष्ठ महाविद्यालयाचे 400 विद्यार्थी व सर्व शिक्षक शिक्षिका उपस्थीत होते. कार्यशाळे चे नियोजन संस्थेचे मौलाना हुझेफा वस्तानवी, डॉ. अकील शेख प्र. कुलगुरू प्रस्तावित जी.एम.वस्तानवी विद्यापीठ यांनी केले. कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी कमवी चे प्राचार्य रफिक जहागीरदार, उपप्रचार्य इम्रान शेख व इतर सर्व कर्मचारी यांनी विशेष प्रयत्न केले.