Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

शिक्षकांच्या आयुष्यभराच्या कमाईवर डल्ला

तळोदा दि १२ (प्रतिनिधी) माध्यमिक विद्यालय तळवे ता तळोदा येथील सेवानिवृत्त शिक्षक देविदास मराठे यांच्या आयुष्याभरातील कमाईवर दिवसाढवळ्या हातातून नऊ लाख रुपये पळवून नेत चोरटे फरार,चोरट्यांचा पाठलाग करताना मुलगा जायबंदी, नंदुरबार येथे उपचार सुरू आहेत.
          देव मोगरा विद्या प्रसारक मंडळाच्या माध्यमिक विद्यालय तळवे येथील शिक्षक देविदास मंगा मराठे ३० सप्टेंबर २०२४ रोजी सेवानिवृत्त झाले,त्याचे पेंशन, ग्रॅच्युइटी, भविष्य निर्वाह निधीची रक्कम स्टेट बँक शाखा तळोदा शाखेत जमा होती.आज दि १२ रोजी दुपारी सव्वा दोन वाजता,सदर रक्कम त्यांनी बँकेतून काली,सोबत मुलगा संकेत सोबत होता, बँकेबाहेर येऊन मुलगा पुढे मोटरसायकल वर बसला व वडील मागे बसत असताना तेवढ्यात दोन इसमांनी येऊन, त्यांच्या हातातील पैश्याची पिशवी घेऊन मोटरसायकलने पळ काढला,यावेळी मोटरसायकलवर असलेल्या संकेत ने त्याचा पाठलाग केला मात्र तो रस्त्यावर घसरुन पडल्याने त्याला तळोदा येथे प्राथमिक उपचार करुन नंदुरबार येथे उपचारांसाठी दाखल केले आहे.त्याना दुखापत झाली आहे.
भरदिवसा घडलेल्या चोरीच्या घटनेने शहरात खळबळ उडाली असून,असून पोलिस घटनास्थळी दाखल होत माहिती घेत तपास करीत आहेत.
        बँकेच्या कार्यपद्धतीचा बळी पडल्याची चर्चा शहरात सुरू आहे.ज्यांना पन्नास हजारांपेक्षा जास्त पैसे हवे असतील त्यांनी बँकेला एक दिवस आधी सुचीत करावे लागते यातुनच चोरट्यांनी पाळत ठेवली असावी, देविदास मराठे एवढी रक्कम काढणार असल्याचे चोरट्यांना कळलेच कसे? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
      पोलिसांना घटनेची खबर दिली असता सपोनि राजू लोखंडे व पोउनि महेंद्र पवार हे पोलिसांसह घटनास्थळी दाखल झाले, बँकेचे सीसीटीव्ही फुटेज तपासून चाचपडत गुन्हा दाखल केला आहे. घटनास्थळी स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरक्षक किरण खेडकर यांनी भेट देऊन तपास सुरू केला आहे. मात्र तळोदा पोलिसांचा तपास कधीच पूर्ण होत नाही,आरोपी सापडणे तर नेहमीच दुरापास्त असते,या गुन्ह्यात पोलिस किती सतर्कतेने गुन्हेगारांना शोधतील, समोर येईलच!?