Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

काँग्रेसचे उमेदवार राजेंद्रकुमार गावीत यांच्या कन्या निवडणूक प्रचारात उतरल्या, गावोगावी भेटीवर भर

तळोदा दि १२(प्रतिनिधी) शहादा तळोदा विधानसभा मतदारसंघात महाआघाडीचे उमेदवार राजेंद्रकुमार कृष्णराव गावित  यांचा प्रचारासाठी मुलगी डॉ विभुती राजेंद्रकुमार गावित व ऋषीका राजेंद्रकुमार गावीत या शहरासह ग्रामीण भागातील गल्लोगल्ली फिरत काँग्रेसचे पंजा चिन्हावर मतदान करण्यासाठी घर भेटी वर भर दिला आहे.
         निवडणूकीचा प्रचार दुसऱ्या टप्प्यात असुन गावागावात रॅली, प्रचारासाठी कोपरा सभा, समाजनिहाय  बैठकांवर भर दिला जात आहे.मतदार ही मत मागायला येणाऱ्यांचे आपुलकीने स्वागत करत गंधटिळा लावुन आरती ओवाळून तुमच्या वडीलांनाच मतदान करणार असल्याची ग्वाही देत आहेत.

      गावोगाव ,शहर शहर निवडणूकीचा वातावरणाने समाजमन ढवळून निघाले आहे.प्रचार पाहता मुली आपल्या बापाचा विजय निश्चित करण्यासाठी मतदार राजांचे अंतर्मन जागृत करण्यासाठी परीश्रम घेत आहेत.बापासाठी मते मागणा-या लेकीच सर्वत्र कौतुक होत आहे.