Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

पाच लाख सत्तर हजार रुपये किंमतीचा 13 मोटरसायकलीसह दोन जण ताब्यात,स्थानिक गुन्हा शाखेची पुन्हा यशस्वी कामगिरी

पाच लाख सत्तर हजार रुपये किंमतीचा 13 मोटरसायकलीसह दोन जण ताब्यात,स्थानिक गुन्हा शाखेची पुन्हा यशस्वी कामगिरी

तळोदा दि २६ (जिल्हा प्रतिनिधी) तळोदा पोलीस ठाणे हद्दीतील श्री रवींद्र मधु ठाकरे यांची बजाज कंपनीची मोटरसायकल ही उमरी तालुका तळोदा येथील फिर्यादीच्या घरासमोरून चोरी झाले बाबत फिर्यादीवरून तळोदा पोलीस अज्ञाता विरुद्ध भा.द.वी. 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
 त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हा शाखेच्या समांतर तपास सुरू असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक  हेमंत पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत गुप्त बातमी, तळोदा शहरातील कॉलेजच्या चौफुली जवळील परिसरात दोन अनोळखी इसम विना विना क्रमांकाचे मोटरसायकली विकण्यास फिरत आहेत अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याबरोबर पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांच्या स्थानिक गुना शाखेचे पोलीस निरीक्षक श्री हेमंत पाटील यांनी पथकास कार्यवाही करण्यास सांगितले.
 स्थानिक गुन्हा शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी मिळालेला खात्रीशीर बातमी मुळे त्या दोन इसमांस वाहनासह ताब्यात घेण्याच्या सापळा रचून त्यांना जायबंद करून यश मिळवले. ताब्यात घेण्यात आलेल्या दोघं इसमास नावे विचारले असता 1) दिलवरसिंग उर्फ कुवऱ्या अहमदभाई वसावा वय 22 वर्ष रा करताल पोस्ट दाबान ता. डेडियापाडा जि-नर्मदा गुजरात 
2) शिवदास ऊर्फ भाया कुवरसिंग पाडवी वय 26 वर्ष रा. रोजवा ता. तळोदा जि. नंदुरबार असे सांगितले...
सदर ताब्यात घेतलेल्या इसमांस त्यांचे ताब्यात असलेल्या मोटरसायकल त्यांच्या कागदपत्रांबाबत विचारणा केले असता ते उडवा उडवी चे उत्तर देऊ लागले. त्यांना पुन्हा विश्वासात घेऊन अधिकची विचारपूस केले असता त्यांनी मोटरसायकली तळोदा व बडवाणी येथून चोरी केले असल्याचे सांगितले.
 त्याबाबत पोलीस अधिकाऱ्यांनी संबंधित पोलीस ठाण्याकडून माहिती घेऊन सदर वाहने चोरीचे असल्याबाबत खात्री केली .
 तसेच सदर इसमांकडे अजून काही चोरीच्या मोटरसायकलींबाबत विश्वासात घेऊन विचारपूस करता त्यांनी मागील दोन ते तीन वर्षात नंदुरबार तसेच बाहेरील जिल्ह्यातून काही मोटरसायकली चोरी केले असल्याची माहिती दिली.
 सदर इसमांनी चोरी केलेल्या एकूण 05,70,000 रुपये किमतीच्या 13 मोटरसायकली हस्तगत करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळाले आहे..
 सदरची कामगिरी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक  श्रवणदत्त अप्पर पोलीस निरीक्षक आशित कांबळे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक  हेमंत पाटील पोलीस उपनिरीक्षक मुकेश पवार,पोलीस हेडकॉन्स्टेबल मुकेश तावडे, मनोज नाईक, सजन वाघ, पोना मोहन ढमढेरे, पो. कॉ. विजय डीवरे,दीपक न्हावी यांनी केली आहे