शहादा दि २७ (प्रतिनिधी) वाल्मिकी माध्यमिक विद्यालय पुरुषोत्तमनगर येथे दिनांक 27 व 28 डिसेंबर 2024 असे दोन दिवसीय तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन शिक्षण विभाग पंचायत समिती शहादा व शहादा तालुका माध्यमिक -उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ व वाल्मिकी माध्यमिक विद्यालय पुरुषोत्तम नगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले.
विज्ञान प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी संस्थेचे अध्यक्ष माननीय बापुसाहेब दीपकभाई पाटील यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन व दीपप्रज्वलन करण्यात आले. माजी पंतप्रधान मा. मनमोहनसिंग यांचे दुःखद निधन झाल्यामुळे प्रथम त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष बापुसाहेब दीपकभाई पाटील यांनी शासकीय दुखवटा पाळत कोणत्याही प्रकारच्या सत्कार करण्यास मनाई केली. अत्यंत साध्या पद्धतीने कार्यक्रम घेण्यात आला.
नवभारत साक्षरता अभियानांतर्गत तालुकास्तरीय उल्हास मेळावा देखील घेण्यात आला. विज्ञान प्रदर्शनात प्राथमिक गट, माध्यमिक गट, शिक्षक गट, प्रयोग शाळा सहाय्यक व परिचर, यांनी देखील सहभाग नोंदवला. असे एकूण 488 उपकरणांची नोंदणी माध्यमिक व उच्च प्राथमिक तसेच उच्च माध्यमिक गटात उपकरणे सादर करण्यात आली. नंदुरबार जिल्ह्यात सर्वात जास्त उपकरणाची नोंदणी करण्यात आली. कार्यक्रमास माननीय श्रीमती उर्मिला पारधे (शिक्षणाधिकारी योजना जि. प. नंदुरबार ), श्रीमती वंदना वळवी (शिक्षणाधिकारी प्राथमिक जि. प. नंदुरबार), जि.प, सदस्या सौ. जयश्रीताई पाटील, सरपंच सौ.कोकिळाताई पाटील, भगवान कोळपे (जिल्हा पोषण आहार अधीक्षक), पंचायत समिती सदस्य श्रीराम याइस, जनकल्याण विश्वस्त मंडळाचे संचालक प्रेमसिंग हिंमतसिंग अहेर, राजाराम तुकाराम पाटील, आनंदराव बभूता पाटील, गटशिक्षणाधिकारी डॉ.योगेश सावळे, तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत पाटील, सचिव जगदीश पाटील, उपाध्यक्ष चंद्रकांत पाटील, संघाचे सर्व पदाधिकारी, तालुक्यातून आलेले मुख्याध्यापक, विज्ञान शिक्षक, वाल्मिकी माध्यमिक विद्यालय पुरुषोत्तमनगर मुख्याध्यापिका श्रीमती सीमा पाटील, पर्यवेक्षक महेश कुलकर्णी आदी मान्यवर कार्यक्रमास उपस्थित होते.
साै. वंदना वळवी शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार पर्यवेक्षक महेश कुलकर्णी यांनी केले. सूत्रसंचालनात पर्यवेक्षकांनी विज्ञान प्रदर्शन भविष्यातील संशोधक तयार करण्यासाठी कसे फायदेशीर ठरते तसेच विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक दृष्टिकोन विज्ञान प्रदर्शनामधून कसा वाढीस लागू शकतो याबाबत मत प्रतिपादित केले. विज्ञान प्रदर्शनासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना व शिक्षकांना मिष्टान्न भोजन देण्यात आले . कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विज्ञान शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमास सर्व विद्यार्थी, शिक्षकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते .