Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

सुरत येथे शालेय विद्यार्थ्यांसाठी श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्य शाखा-गुजरात राज्याच्या वतीने सामान्य ज्ञान स्पर्धा संपन्न.

सुरत येथे शालेय विद्यार्थ्यांसाठी श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्य शाखा-गुजरात राज्याच्या वतीने सामान्य ज्ञान स्पर्धा संपन्न.....!

क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यतिथी निमित्त उपक्रम

 सुरत येथे शालेय विद्यार्थ्यांसाठी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या जीवन कार्यावर आधारित सामान्य ज्ञान परीक्षा चे आयोजन* श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष श्री.जितेंद्र सुरेश महाजन व श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्य शाखा-गुजरात राज्याचे सुरत जिल्हा संपर्क प्रमुख प्रा.श्री.विलास देवाजी माळी,सर तसेच D.M.Education डिंडोली सुरत चे संचालक प्रा.श्री.दिनेश माळी,सर यांच्या वतीने करण्यात आले होते सदर स्पर्धा दि.२२ डिसेंबर २०२४ रविवार रोजी D.M.EDUCATION
FF-1-2-3,रामी पार्क सोसायटी जवळ,डिंडोली,सुरत येथे संध्याकाळी ४:०० ते ५:०० या वेळेत पार पडली सदर स्पर्धेत ७० शालेय विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असून परीक्षा शांततेत संपन्न झाली. सदर सामान्य ज्ञान परीक्षेत
सहभागी सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत तसेच प्रथम,द्वितीय,तृतीय तसेच उत्तेजनार्थ स्पर्धकांना योग्य ते पारितोषिक D.M.Education डिंडोली सुरत चे संचालक प्रा.श्री.दिनेश माळी,सर यांच्या वतीने देण्यात येणार आहे.
सदर स्पर्धा यशस्वीतेसाठी परीक्षा समन्वयक प्रा.श्री.दिनेश माळी,सर यांनी काम पाहिले तसेच स्पर्धा यशस्वीतेसाठी श्री संत सावता माळी युवक संघ शाखा-गुजरात राज्याचे सुरत जिल्हा संपर्कप्रमुख प्रा.श्री.विलास देवाजी माळी,सर यांनी परिश्रम घेतले.