नंदुरबार दि १८ (प्रतिनिधी) जी टी पाटील महाविद्यालयात अल्पसंख्यांक हक्क दिवस 18 डिसेंबर व मायनॉरिटी सेल चे उद्घाटन उत्साहात संपन्न झाlले. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य तथा विद्यापरिषद सदस्य क.ब.चौ उमवि जळगाव डॉ एम जे रघुवंशी होते त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना सांगितले की, आपला देश विविधतेतून नटलेला व विविधतेतून एकात्म असलेला देश आहे त्यामुळे अल्पसंख्यांक मग ते भाषिक किंवा धार्मिक यांच्या विकासासाठी घटनेने अधिकार दिले आहे तरी आपण आपल्या अधिकारांचा वापर करून आपला सर्वांगीण विकास करावा असे आवाहन केले तत्पूर्वी कार्यक्रमाची प्रस्तावना व प्रमुख पाहुणेचा परिचय मायनॉरिटी सेल चे समन्वयक डॉ व्ही एफ मक्रणी यांनी केले. कार्यक्रमाचे उद्घाटक न ता विं समितीचे संचालक परवेज खान यांनी अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांनी जागरूक राहावे व संविधानाने दिलेल्या सुविधेचा लाभ घ्यावा असे प्रतिापादन केले. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एन डी चौधरी यांनी अल्पसंख्यांक गटात कोण येतात घटनेने कोणकोणत्या तरतुदी केलेले आहे या बद्दल सविस्तर माहिती देताना सांगितले की,.आपल्या घटनेने प्रत्येकाला आपल्या भाषेचे धर्माचे संस्कृतीचे जतन करण्याचे अधिकार अल्पसंख्यांकांना दिले आहे .सदर कार्यक्रमाला संस्थेचे समन्वयक डॉ एम एस रघुवंशी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ एस पी पाटील कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा टी जी पाटील IQAC समन्वयक डॉ एम आर पाटील डॉ व्ही झेड चौधरी सर मायनॉरिटी सेल चे प्रा के बी दवे प्रा अबुजर पठाण उपस्थित होते कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा मोईन शेखयांनी तर आभार प्रदर्शन डॉ समीरा अहरार अहमद यांनी मांडले सदर कार्यक्रमाला मोठ्या संख्येने प्राध्यापक प्रध्यापकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते