परभणी येथे भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीच्या शिल्पाची झालेली मोडतोड तसेच भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणाचा निषेध करीत यातील दोषींवर कठोर कारवाई व्हावी या मागणीसाठी अक्कलकुवा येथे तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले. 
अक्कलकुवा येथे देण्यात आलेल्या निवेदनात नमुद केले आहे की, परभणी येथे भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीच्या शिल्पाची मोडतोड करण्यात आली तसेच भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कोठडीत पोलिसांनी केलेल्या मारहाणीत मृत्यू झाल्याच्या आरोपां बाबत निषेध व्यक्त करण्यात येऊन यातील दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी तसेच मयत सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटुंबीयांना शासनाने आर्थिक मदत द्यावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल.
मागण्यांचे निवेदन तहसीलदार विनायक घुमरे व पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांना देण्यात आले यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी बापू महिरे ,मधुकर कापुरे, कृष्णा साळवे, अनिल जावरे, संजय साळवे, लक्ष्मण साळवे ,नरेंद्र बागले, संजय पिंपळे, प्रवीण साळवे, सुनील साळवे ,भरत साळवे, मनोज गुलाले, तुषार पाडवी, सचिन साळवे, नरेश बागुल, प्रकाश साळवे ,सागर कापुरे, जितेंद्र अहिरे ,राज पाडवी आदि उपस्थित होते.