Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

अनंत श्री विभुषित जगद्गुरू रामानंदचार्य श्री स्वामी नरेंद्रचार्यजी महाराज यांचा तळोदा शहरात भव्य असा पादुका दर्शन मिरवणूक

तळोदा शहरात आज पादुका दर्शन सोहळा मोठ्या उत्साहात सुरु झाला....


अनंत श्री विभुषित जगद्गुरू रामानंदचार्य 
श्री स्वामी नरेंद्रचार्यजी महाराज यांचा तळोदा शहरात भव्य असा पादुका दर्शन सोहळा हा मोठ्या उत्साहात भाविक भक्तांसह निघाला असून..
त्यात सर्व तळोद्यातील नागरिकांचा समावेश असून आदिवासी बंधू भगिनी यांनी पारंपरिक वेशभूषा करून पारंपरिक वाद्य वाजत गाजत पादुका दर्शनाला सुरुवात केली असून स्वामींचा संदेश "तुम्ही जगा आणि दुसऱ्यालाही जगवा....
"तुम्ही मला भक्ती द्या, मी तुम्हाला स्थैर्य देईल अश्या  जय घोष देत सारे भाविक भक्त स्वामींच्या पादुका मिरवणुकीत तल्लीन होऊन नाचत चालत होते....
स्वामींचा अध्यात्मिक मार्ग हा जीवनाला अर्थ देणारा असून तळोदा शहरातील तसेच तळोदा तालुक्यातील असंख्य भाविक भक्त या पादुका मिरवणुकीत सहभागी होते...

जगद्गुरू नरेंद्रचार्य महाराज संस्थान विनामूल्य सामाजिक उपक्रम खालील प्रमाणे...
1) शैक्षणिक उपक्रमांतर्गत जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज एज्युकेशनल इन्स्टिट्यूट मध्ये विनामूल्य शिक्षण दिले जाते...
2) वैद्यकीय उपक्रमांतर्गत 
 मरणोत्तर देहदान 
 सप्टेंबर 2016 स*** मरणोत्तर देहदान या उपक्रमांतर्गत देह समाजाच्या सेवेसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना सुपूर्द करण्यात आले 
3) वैद्यकीय उपक्रमांतर्गत 
 समर्थ सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज हॉस्पिटल 
4) दुर्बल घटक पुनर्वसन उपक्रमांतर्गत 
 संकल्प आमच्या बेरोजगारांना उभे करण्याच्या 
 सुशिक्षित बेरोजगार युवकांना वाहन प्रशिक्षण देऊन रोजगाराचे संधी उपलब्ध करून दिली उपपीठ मुंबई येथे हे काम असेच पुढे सुरू आहे 
5) कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय रामटेक संचालित 
 आद्य जगत गुरु रामानंदाचार्य वेद पाठशाळा 
6) वैद्यकीय उपक्रमांतर्गत ब्लड इन नीड 
 सद्गुरु नरेंद्रचार्य महाराज संस्थान ब्लड इन नीड या हेल्पलाइनच्या माध्यमातून महाराष्ट्र गोवा गुजरात व अनेक राज्यात या रुग्णांना रक्ताची गरज भासते त्या ठिकाणी जाऊन 25000 रुग्णांना रक्त देऊन त्यांचे प्राण वाचवले 
तसेच 
 जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान मोफत रुग्णवाहिका सेवा 
 53 रुग्णवाहिका दहा राष्ट्रीय महामार्गावर कार्यरत..
 राष्ट्रीय महामार्गावरील 23784 हजाराहून अधिक अपघातग्रस्तांना जीवनदान...