विखरण- नंदुरबार जिल्ह्यातील श्री.धंगाई विधायक कार्य मंडळाचे श्री. आप्पासाो. आत्माराम धवळू देवरे माध्यमिक विद्यालय विखरण येथे सन-२००८-०९ या शै.वषाॅची इ. दहावीतील विद्यार्थ्यांनी स्वयंप्रेरणेने एकत्र येऊन मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना निमंत्रण देत माजी विद्यार्थी संमेलनासाठी आमंत्रित केले.माजी विद्यार्थ्यां, विद्यार्थीनींनी सहभागी होत सर्व गुरुजनांचा सन्मान केला.
आपल्या बालगोपालांसह हजेरी लावून आपापल्या मनोगतांद्वारे नव्या इमारतीचे, प्रांगणाचे, डिजीटल वर्ग रचना व सोयीसुविधांचे कौतुक केले.व तत्कालीन मातीच्या धाब्याच्या, शेणामातीने सारवण केल्या जात असलेल्या वर्गातील संस्मरणीय अनुभव व्यक्त करत माजी विद्यार्थी भावनिक झाले.त्यावेळी इंग्रजी,गणित विषयांचा व विविधांगी अनुभव कथनातून हास्याचा फुलोरा देखील फुलला.आज माजी विद्यार्थी इंजिनिअर,शिक्षक ,लॅंग्वेज ट्रेनर,कृषी शास्त्रज्ञ,पोलिस अधिकारी,आदर्श शेतकरी, ग्रा.पं.सदस्य,महसूल विभाग,उद्योजक पदावर कार्यरत आहेत.प्रत्येकाने आपल्या पारीवारिक माहिती मनोगताद्वारे मांडली.आदर्श शेतकरी जितेंद्र हंसराज पाटील यांने १२वीला असतांनाच वडील देवाज्ञा झाल्यावर घराची जबाबदारी पार पाडत तापी नदीच्या पात्रातून पाणी पुरवठा करून १० एकर क्षेत्र ओलीताखाली आणले व उत्तमपणे शेती कशी करता येते याचे उदाहरण गावासमोर ठेवले.पावबा संतोष मराठे याने नौकरी करत बहिस्त पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले व इंग्रजी लॅंग्वेज ट्रेनर म्हणून नावलौकिक मिळवले. विद्यालयातील उपशिक्षक डी.बी.भारती,एम.डी.नेरकर,
वाय.डी.बागुल,सी.व्ही.नांद्रे यांनी आपल्या मनोगतांतून शिक्षण हे वाघीणीचे दुध आहे ते पिल्यावर गुरगुरल्या शिवाय राहत नाही.संघर्षातून समृद्धीकडे वाटचाल खडतर असते मात्र एकदा चालायला लागलो तर सुयश आपल्याला नक्कीच मिळतं.मात्र जगातील धावत्या स्पर्धेत आई-वडील,भाऊ परीवारावर लक्ष व व्यसनांपासून दूर राहीलात आयुष्य सार्थकी लागेल... तुमचं सुयश हेच आमचं हिमालयीन समाधान आहे.अशा शब्दांत व्यक्त केले.मुख्याध्यापक डी.डी.साळुंके यांनी तत्कालीन शालेय परिस्थिती व आजच्या शाले भौतिक सुविधा यातील अंतर मांडताना केलेला संघर्ष सांगून नंदुरबार जिल्ह्यातील एक उपक्रमशील विद्यालय नावारूपाला आले आहे, संस्थाचालक,आपल्यासारख्या आजी-माजी विद्यार्थी, पालकांच्या सहभागामुळे व सहकार्यानेच... मनुष्य मरेपर्यंत विद्यार्थी असतो तेव्हा आपल्या पिढीच्या शिक्षणासाठी अद्ययावत राहण्याचे आवाहन केले.विद्यालयाला सप्रेम भेट म्हणून देशभक्त, शास्त्रज्ञांच्या प्रतिमा माजी विद्यार्थ्यांनी दिल्यात.उपस्थितांनी स्नेह भोजनाचा आस्वाद घेतला.विविध खेळ,संगीत खुर्ची,जर-तर,रॅम्प वॉक,सामूहिक नृत्य,मनोरंजक कृती घेऊन मेळाव्याचा समारोप करण्यात आला.मेळावा संयोजन यशस्वीतेसाठी स्वप्निल पाटील,क्रांतीकुमार चव्हाण,सतिश पाटील,किरण चिने, कपिल पाटील,धर्मा भील,विजय मराठे,लिलेश्वर खैरनार,वैशाली पाटील,वृषाली पाटील,स्वाती पाटील,मिना ललवाणी,अनिता पाटील,शुभांगी पाटील,सीमा पाटील,मिना पाटील,रेखा पाटील,आशा पाटील,रंजना पाटील,पवित्रा पाटील यांनी परीश्रम घेतले.