तळोदा दि ३१ (प्रतिनिधी) तालुक्यातील तुळाजा येथे आज दि ३१ रोजी जिल्हा परिषद मराठी शाळा व माध्यमिक विद्यालय तुळाजा यांचा संयुक्त विद्यमाने शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले .
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बोरद बीटचे केंद्रप्रमुख दशरथ वायकर हे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून तुळाजा गावाचे सरपंच श्रीमती मीराताई राहासे,उपसरपंच संदीप खर्डे, जि. प. सदस्या सूनिताताई पवार शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किरण डुमकुल प्रमुख अतिथी शिक्षण विस्तार अधिकारी वसंत जाधव हे उपस्थित होते. सूत्रसंचालन श्री दीपक पाटील यांनी केले. शिक्षण परिषदेत विविध शैक्षणिक विषयांवर तासिका घेण्यात येऊन प्रत्यक्ष अध्यापन पद्धतीत बदल घडवून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीस पूरक वातावरण तयार करणे या विषयी मार्गदर्शन करण्यात आले.श्री वसंत जाधव साहेब यांनी मुकअभिनयचा माध्यमातून शैक्षणिक गुणवत्ता संदर्भात मार्गदर्शन केले आभार विलास मगरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर बंधू यांनी परिश्रम घेतले.