Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

शेठ.के.डी.हायस्कूल तळोदा येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त वक्तृत्व स्पर्धा संपन्न.


तळोदा दि ३ (प्रतिनिधी)पी.ई.सोसायटी संचलित शेठ.के.डी.हायस्कूल तळोदा येथे आज दि.०३/०१/२०२५ रोजी शाळेचे मुख्याध्यापक जे.एल.सुर्यवंशीयांच्या मार्गदर्शनाखाली ३ जानेवारी हा दिवस क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी-पर्यवेक्षक पी.पी.पाटील होते.सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. प्रास्ताविक-जे.आय.राणे व एस.के.माळी यांनी केले.यावेळी 
सुत्रसंचालन:-के.ए.बोरदे व एम.डी.जावरे यांनी केले.जी.आय.चौधरी यांनी ओवी म्हटल्या. विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
शिक्षक भाषणात- ए.डी.पाडवी ,एस.बी.वसावे ,पी.बी.राजपूत,आर ए मगरे यांनी मनोगत व्यक्त केले.पी.पी.पाटील सर यांनी अध्यक्षीय भाषणात सावित्रीबाई फुलें यांचे विचार आत्मसात करुन त्यांच्या कार्याची प्रेरणा विध्यार्थ्यांनी घ्यावी.असे आवाहन केले.आभार प्रदर्शन:-एस.एस.ठाकरे & एन.जी.वळवी यांनी केले.पी.पी.पाटील,व्ही.आर.सुर्यवंशी यांच्या कडून सहभागी विद्यार्थ्यांना पेन व टि.एस.सुर्यवंशी.के.ए.बोरदे,जे.डी.देवरे ,आर.आय. चव्हाण,जे.आय.राणे यांच्या कडुन रोख रक्कम बक्षीस म्हणून देण्यात आली.
मान्यवरांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षिसाचे वाटप करण्यात आले.स्पर्धेचे परिक्षण व्ही.बी.पगार ,आर.आय.चव्हाण,आर.आर.पाडवी यांनी काम पाहिले.
छायाचित्रे ए.पी.सोनार यांनी काम पाहिले. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक जे.एल.सुर्यवंशी,उपमुख्याध्यापक जे.एन.माळी , पर्यवेक्षक पी पी.पाटील सर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी बंधु-भगिनी उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी बंधु-भगिनी यांनी परिश्रम घेतले सामुहिक राष्ट्रगीत घेऊन समारोप करण्यात आला.