तळोदा दि ३ ( प्रतिनिधी ) गुलाबबाई दुल्लभ राजकुळे कन्या विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले जयंती बालिका दिन म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक मिलिंद धोदरे यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले व राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.
कार्यक्रमास ज्येष्ठ शिक्षक नरेंद्र महाले, उल्हास मगरे, भाग्यश्री सागर,आदी शिक्षकांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकला.यावेळी विद्या कावीरे, गौरी जाधव, कोमल पाडवी, भाग्यश्री कावेरे आदी विद्यार्थिनींनी आपले मनोगत व्यक्त केले.
तर मुख्याध्यापक मिलिंद धोदरे यांच्या सावित्रीबाई फुले यांच्यावरील अहिराणी कवितेने उपस्थितांचे लक्ष वेधले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन श्रीमती ज्योती महाजन यांनी केले. तर आभार योगेश पाटील यांनी मानले. कार्यक्रमास अनिल इंदीस दिलीप तडवी, आकाश महाजन, भाग्यश्री सागर, दिनेश मराठे, धनराज केदार, हिरालाल पाडवी, अनिल मगरे सुदाम माळी, आदींसह विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.