Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

अल्फाबेट स्कूल मोलगी येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त कार्यक्रम

मोलगीच्या अल्फाबेट स्कूल मध्ये महापरीनिर्वाण दिवस साजरा
मोलगी दि ६(प्रतिनिधी)
  अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी येथील मूळबीज शैक्षणिक संस्था संचलित अल्फाबेट इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यतिथीवर महापरीनिर्वाण दिवस साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख म्हणून मोलगीच्या आरोग्य उपकेंद्राचे सामुदायिक आरोग्य अधिकारी डॉ. गिरम्या राऊत प्रमुख मान्यवर रामसिंग तडवी, ईश्वर वसावे व अध्यक्षस्थानी प्राचार्य गोटूसिंग वळवी होते. 
             कार्यक्रमाच्या सुरुवातीला महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर कार्यक्रमाची प्रस्तावना शिक्षिका मथुरा वसावे यांनी केली. तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे मोलगीच्या आरोग्य उपकेंद्राचे सामुदायिक आरोग्य अधिकारी डॉ. गिरम्या राऊत यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर मार्गदर्शन केले व लहान बालकांचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या. त्यानंतर रामसिंग तडवी यांनी विविध विषयावर मार्गदर्शन केले तसेच शाळेतील विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करत उपस्थितांचे मने जिंकून घेतली. 
                   या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी साठी उपमुख्याध्यापक ईश्वर वसावे, प्राची पाडवी व हीराबाई वळवी यांनी मेहनत घेतली. तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अल्फाबेट स्कूलच्या शिक्षिका लीला पाडवी यांनी केले तर आभार मनीषा वसावे यांनी मानले.