Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

आमचा आमदार मंत्रिमंडळात जायला हवा अशी चर्चा व तळोदेकरांची इच्छा

आमचा आमदार मंत्रिमंडळात जायला हवा अशी चर्चा व तळोदेकरांची इच्छा 
तळोदा दि ६(प्रतिनिधी)शहादा-तळोदा मतदार संघांचे लोकप्रिय आमदार राजेश पाडवी हे मोठ्या मताधिक्याने निवडून आले आहेत.
तसेच राज्यात महायुतीला बहुमतही मिळाले आहे म्हणून आमदार राजेश पाडवी यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्याची मागणी आमदार राजेश पाडवी यांचा समर्थकांनी केली आहे... आज पर्यंत तापी पलीकडच्या म्हणजे नंदुरबार आणि नवापूर मतदार संघातील प्रतिनिधींना प्रतिनिधित्व देण्यात आले आहे याच्यात पालकमंत्री पदाचा देखील समावेश आहे.
 पंचवीस वर्षांपूर्वी कै.दिलवरसिंग पाडवी यांचा नंतर पद्माकर वळवी व ऍड के. सी. पाडवी यांना देखील दोन दोन वर्ष राज्यमंत्रीपद देण्यात आले होते.
 वर्षानुवर्षे कॅबिनेट मंत्रीपद हे नवापूर आणि नंदुरबार मतदार संघाला देण्यात आले आहे..
 तरी आता शहादा तळोदा मतदार संघाच्या विकास आमदार राजेश पाडवी हेच करू शकतील अशी अपेक्षा त्यांच्या समर्थकांनी वर्तविली आहे....