Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, जिल्हा पोलिस अधीक्षक श्रवण दत्त एस,मुख्य कार्यकारी अधिकारी सावन कुमार यांच्या उपस्थितीत सारंगखेडा यात्रा आढावा बैठक संपन्न


शहादा दि ६ (प्रतिनिधी)
जिल्हाधिकारी, डॉ. मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली सारंगखेडा यात्रा सन-2024 यात्रा कालावधीत करावयाच्या उपाययोजना / खबरदारी याबाबत सारंगखेडा येथील श्री. दत्त मंदीर सभागृह या ठिकाणी आज आढावा बैठक घेण्यात आली.
     यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावन कुमार, जिल्हा पोलीस अधिक्षक श्रवण दत्त एस., उपविभागीय अधिकारी, शहादा सुभाष दळवी, उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसिलदार, यांच्या प्रमुख उपस्थितीत व जिल्ह्यातील तसेच तालुक्यातील सर्व विभाग प्रमुख श्री.दत्त मंदीर देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष व इतर मान्यवर, चेतक फेस्टीवल चे आयोजक श्री. जपालसिंह रावल , ग्रामस्थ, पत्रकार बांधव उपस्थित होते.

सदरच्या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ मित्ताली सेठी यांनी सर्व विभाग प्रमुखांना यात्राकालावधी करावयाच्या उपायोजनासाठी आपल्या विभागातील विविध अधिकारी कर्मचारी यांची नेमणूक करने, यात्रा कालवधीत येणाऱ्या भाविकांना व्यवस्थित सर्व सोयी सुविधा उपलब्ध होतील
 यासाठी नियोजन करणे, प्रामुख्याने महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी यांनी सर्व विद्यूत पुरवठा व्यवस्थित होईल यासाठी नियोजन करणे, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांनी भाविकांसाठी बसेसची व्यवस्था करणे, अन्न व नागरी औषध प्रशासन विभाग यांनी यात्रा कालावधीत लावण्यात येणाऱ्या सर्व खाद्य पदार्थ विक्री दुकाने यांना परवाने देणे, खाद्य पदार्थांचे नमूने घेणे, ग्रामपंचायत सारंगखेडा यांनी स्वच्छता पाणी पुरवठा आदी कामे, आरोग्य विभागाने रुग्ण वाहिका, औषध साठा, फवारणी अत्यावश्यक सेवा उपलब्ध करुन देणे, सर्व दुकानांच्या ठिकाणी अग्निशामक यंत्र बसविणे, नगरपालिका मुख्य अधिकारी यांनी दोंडाईचा नंदुरबार या ठिकणी संपर्क साधून फिरते शौचालय व अग्निशामक वाहने उपलब्ध करुन द्यावी, सार्वजनिक बांधकाम यांत्रिक, विद्यूत विभाग यांनी यात्रा सुरु होणेपुर्वी त्याठिकाणी लावण्यात येणारे यंत्रसामुग्रीची तपासणी करणे महसूल व पोलीस विभाग यांनी समन्वयाने सर्व व्यवस्थांवर लक्ष ठेवून यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी जबाबदारी पार पाडावी अशा सूचना उपस्थितांना देण्यात आल्या.