तळोदा दि ९(प्रतिनिधी)बांगलादेशात कधीपासून सुरु असलेल्या हिंदुवरील अत्याचाराचा निषेध दर्शवण्यासाठी तळोद्यात सकल हिंदु समाज तर्फेदि १० डिसेंबर रोजी मुकमोर्चाचे आयोजन करण्यात आले असून त्या मुकमोर्च्यात तळोद्यातील प्रत्येक व्यापारी म्हणजे कापड दुकान व्यापारी, मेडिकल व्यावसायिक, किराणा व्यापारी आणि अन्य सर्व व्यापारी वर्गाने निषेध ला सहमती दिली असून मोठ्या संख्येने हा मुकमोर्चा निघणार आहे.
बांगलादेशातील हिंदूंची स्थिती एवढी भयावह आहे की ते आपण चित्रफीत मध्ये सुद्धा बघू शकत नाही...
बंगलादेशातील ज्या इस्कॉन मंदिराने त्यांचा वाईट काळात त्यांना अन्नदान केले आहे अश्या पवित्र इस्कॉन मंदिराला तेथील लोकांनी एक आतंकवादी संघटना म्हणून घोषित केले असून त्याच इस्कॉन मंदिराचे प्रमुख संत चिन्मयदास यांना अटक सुद्धा केली आहे...
तरी मुकमोर्च्यात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे अशी हाक सकल हिंदुत्ववादी संघटनाच्या वतीने केली आहे
मोर्चा सकाळी दहा वाजता दत्त मंदिर पासुन निघणार आहे.