नंदुरबार दि २८(प्रतिनिधी) लालपरी शहरी व ग्रामीण भागातील जनसामान्य प्रवाशांची जीवनरेषा आहे. राज्य शासनाने नुकताच एसटीचे भाडे वाढ केली आहे. एसटी बस च्या भाडेवाढीच्या निषेधार्थ जिल्हा शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटामार्फत येथील बस स्थानकावर जिल्हाप्रमुख अरुण चौधरी यांच्या नेतृत्वाखाली जनआंदोलन करण्यात आले. यावेळी सामान्याचे जीवनरेषा असलेल्या एसटीच्या भाडेवाढीच्या निषेधार्थ घोषणा देण्यात आल्या.
यावेळी आगार प्रमुख संदीप निकम यांना निवेदन देण्यात आले. निवेदनातील आशय असा शासनाने नुकताच एसटी बस भाडेवाढ केली त्याच्या निषेधार्थ एसटी बस स्थानक प्रवेशद्वारावर एसटी बस थांबवून शिवसेना उबाठा मार्फत जिल्हा प्रमुख अरुण चौधरी यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने महामंडळाने केलेल्या अन्यायकारक भाडेवाढी विरोधात जनआंदोलन छेडण्यात आले आहे. सामान्य नागरीकांवर वाढत्या आर्थिक भारामुळे मोठी अडचण निर्माण झाली आहे. एस.टी. प्रवास हे ग्रामीण भागातील नागरीकांसाठी जीवनरेखा आहे. मात्र, भाडेवाढीमुळे प्रवाशांचे हाल होत असून ती तातडीने मागे घेण्यात यावी अशी मागणी शिवसेनेचे पदाधिकारी करीत आहे.
शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांच्या नेतृत्वाखाली आंदोलनाचे आयोजन करण्यात आले असून यात विविध तालुका प्रमुख, पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. भाडेवाढ मागे घेतली नाही तर अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात येणार आहे.
निवेदनावर जिल्हाप्रमुख अरुण चौधरी, उपजिल्हाप्रमुख अर्जुन मराठे , तालुकाप्रमुख रमेश पाटील, युवा मोर्चा उपजिल्हाधिकारी सागर पाटील, जिल्हा सचिव दिनेश भोपे, शहर प्रमुख राजधर माळी, विनोद चौधरी, वाहतूक सेना जिल्हा प्रमुख धारू कोळी, उपाध्यक्ष छोटू चौधरी, भक्तवत्सल सोनार, राहुल चौधरी, एजाज काझी , आनंदा पाटील, राज पाटील, अयान खाटीक, धीरज घाटे, रोहित मराठे, निंबा पाटील, बबलू नागरे, सुनील पवार, जितेंद्र भील, आनंदा मराठे, अमोल पाटील यांच्यासह आहेत.