निवेदनाचा आशय असा, संघटनेकडे प्राप्त झालेल्या तक्रारी या आर्थिक स्वरुपाच्या आहेत. या तक्रारींची प्रामाणिक स्वरुपात शहानिशा केल्यानंतर या सदर तक्रारींमध्ये तथ्य असल्याचे निष्पन्न होत आहे. त्यापैकी काही तक्रारी पुढील प्रमाणे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वर्षा लहाडे यांनी २०२४ मध्ये जिल्हा रुग्णालयात कंत्राटी पध्दतीने भरती झालेल्या उमेदवारांकडुन पैश्यांची देवाण घेवाण केल्याचा आरोप केला जात आहे. तसेच भारती प्रक्रिया पुर्ण झाली किंवा नाही याबाबत कोणत्याही प्रकारची स्पष्ट माहिती उपलब्ध नाही.
जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या अधिपत्याखालील आस्थापनेखालील कायमस्वरुपी / कंत्राटी अधिकारी / कर्मचारी यांच्याकडुन वेतनकरणे, नुतनीकरण करणे, पोस्टींग / प्रतिनियुक्ती रद्द करणे, पदोन्नती करणे, कर्मचारी रजा मंजुर करणे, वरिष्ठ स्तरावर प्रस्ताव पाठवणे, गोपनिय अहवाल, जीपीएफ काढणे, इ. यासारख्या अनेक प्रशासन किंवा कामांसाठी आर्थिक देवाण घेवाणीची मागणी करतात त्यात मानसिक त्रास दिला जात आहे.
ज्या विभागाअंतर्गत निधी उपलब्ध झाला आहे त्या व्यतिरिक्त इतर कामांसाठी निधी वापरला जात आहे. वार्षिक पेटी सप्लाय (स्टेशनरी) यांची मागणी नसतांना देखील निकृष्ट दर्जाची स्टेशनरी ग्रामिण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालय येथे का सप्लाय करण्यात आली? याची चौकशी होणे गरजेचे आहे.
अधिकारी व कर्मचारी यांना दबावात ठेवणे, अरेरावीची भाषा वापरणे, अभ्यंगतांना मोबाईल कॅबीन बाहेर ठेवायला लावणे. वैद्यकिय अधिकाऱ्यांचे मानसिक खच्चीकरण करणे. प्रतिनियुक्तीचे अधिकार नसतांना आदेश देणे किंवा रद्द करणे. तदर्थ नुतनीकरण करणे यासाठी आर्थिक व्यवहार करणेस भाग पाडणे या सारख्या तक्रारी प्राप्त आहे. नियुक्तीचे प्रस्ताव जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, यांचे सह वरिष्ठ स्तरावर पाठविले जात नाही.
आदिवासी भागात काम करण्यासाठी विशेष प्रोत्साहन भत्ता लागु करण्यासाठी आर्थिक देवाण घेवाणाची मागणी केली जाते.
डॉ. प्रज्ञा वळवी महिला रुग्णालयाच्या वैद्यकिय अधिकारी असतांना आपले कोणत्याही प्रकारचे दैनंदिन काम न करता डॉ. वर्षा लहाडे यांचे सोबत खाजगी सचिव हस्तक म्हणुन काम करतात.
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत असलेल्या कर्मचाऱ्यांचे पुर्ननियुक्ती आदेश जुलै महिन्यात दिले जातात परंतु ते आदेश देण्यास सहा महिने विलंब करण्यात आला व पुर्ननियुक्ती आदेश देण्यामागे उद्देश काय ?
डॉ. वर्षा लहाडे यांच्यावर जिल्हारुग्णालय नाशिक येथे असतांना त्यांच्यावर स्त्रीभ्रूण हत्या या सारखा गंभीर स्वरुपाचा गुन्हा असल्याने त्यांच्यावरती IPC ४६८, ४७१, ४२०, १७७, १७८, १८६ अंतर्गत गुन्हा दाखल आहे. ज्याचा निर्णय अजुन आलेला नाही. तसेच त्याचं नाशिक येथील खाजगी रुग्णालय शासनाने सिल केलेले आहे. अश्या परिस्थितीत त्यांची नियुक्ती हि आदिवासी बहुल भागात जिल्हयात जिल्हाशल्य चिकित्सक या पदावर कशी केली गेली? हे अतिशय गंभीर बाब असुन याबाबत सामान्य लोकांच्या मनात शासनाच्या नियुक्ती व बदली धोरणाविषयी साशंकता निर्माण होत आहे याची देखील चौकशी होणे गरजेचे आहे. जिल्हाशल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे व नंदुरबार जिल्हा शासकिय महाविद्यालयाचे अधिष्ठात डॉ. संजय राठोड यांच्यातील समन्वयाचा अभाव व वादविवाद यामुळे जिल्हयातील सामान्य रुग्णांच्या आरोग्याची हेळसांड होत आहे अशी संतापाची भावना जनसामान्य माणसांच्या मनात झालेली आहे.
वरील सर्व गंभीर मुद्दयांची राज्यस्तरावरुन सखोल चौकशी होवुन डॉ. वर्ष लहाडे यांच्यावर बदली किंवा पदावनत्तीची कारवाई करण्यात यावी. अन्यथा संघटनेच्य माध्यमातुन संविधानीक पध्दतीने तिव्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी व होणाऱ्या परिणास शासन प्रशासन जवाबदार राहिल असे नमूद करुन निवेदनावर राष्ट्रीय आदिवासी एकता परीषद राज्य उपाध्यक्ष रोहिदास वळवी, नंदुरबार जिल्हाध्यक्ष पंकज वळवी, जिल्हा उपाध्यक्ष लालसिंग तडवी, महासचिव
सुधिर वळवी, सचिव अँड कुवरसिंग वळवी,विश्व आदिवासी सेवा संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र बागुल सचिव संभाजी जगताप, यांच्या सह्या आहेत