नंदुरबार दि १०(प्रतिनिधी) एस.ए. मिनिस्ट्रीज ट्रस्ट नंदुरबार, आयोजित एस.ए. मिशन कार्निव्हल 2025 फेस्टिवल मध्ये समाजासाठी शैक्षणिक, सामाजिक कार्यात आदर्श कार्य करून मोलाचे योगदान देऊन तमाम मानव समाजाला प्रेरणा देणारे,प्रोत्साहित करणारे कार्य, निस्वार्थपणे करणारे निवडक बांधवांना सन्मानित करण्यात आले.
त्यात ग्रामीण / आदिवासी भागात शैक्षणिक, सामाजिक कार्यात उल्लेखनीय कार्य करणारे श्री. अप्पासो.आ.ध. देवरे माध्यमिक विद्यालय विखरण ता.जि.नंदुरबार विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. डी.डी.साळुंके यांना एस.ए.मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय नंदुरबार विद्यालयाच्या प्राचार्या नूतनवर्षा आर.वळवी यांच्या हस्ते 'नंदुरबार रत्न' पुरस्कार प्रदान करण्यात आला.या कार्यक्रमाला एस.ए.मिनिस्ट्रीज नंदुरबार ट्रस्ट चे कार्यकारी संचालक / सचिव राजेश जे.वळवी चेअरमन श्रीम. माथाॅ सुतार व संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.
श्री धंगाई विधायक कार्य मंडळाचे, अध्यक्ष राजेंद्र देवरे,शालेय समितीच्या अध्यक्षा,शैलजा देवरे व संस्थेचे पदाधिकारी तसेच देवरे विद्यालयाचे शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व विखरण,नाशिंदा, बोराळा,खापरखेडा गावातील ग्रामस्थ व शेवाळी,साक्री,गावातील आप्तेष्ट, मित्रमंडळी, जिल्हा मुख्याध्यापक संघ यांनी डी.डी.साळुंके यांचे अभिनंदन केले.