Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

एच. एम. पी. व्ही आजाराला घाबरू नका; योग्य काळजी घ्या!-डॉ. संजय राठोड (शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नंदुरबार)

एच. एम. पी. व्ही आजाराला घाबरू नका; योग्य काळजी घ्या!-डॉ. संजय राठोड

 नंदुरबार, ९ जानेवारी २०२५ तुमच्या आरोग्य सुरक्षेसाठी महत्त्वाची माहिती:-
ह्युमन मेटा न्यूमो व्हायरस (एच. एम. पी. व्ही) हा नवीन आजार नाही, तर २००१ पासून तो ज्ञात आहे. हा सौम्य स्वरूपाचा हंगामी आजार आहे ज्यामुळे सर्दी, खोकला अशी लक्षणे दिसतात. त्यामुळे नागरिकांना घाबरण्याचे कारण नाही, असे सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रमुख डॉ. संजय राठोड यांनी सांगितले आहे.

 एच. एम. पी. व्ही म्हणजे काय?
 हा विषाणू प्रामुख्याने हिवाळा आणि वसंत ऋतूमध्ये सक्रिय असतो.
 मुले, वृद्ध आणि कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांना जास्त धोका असतो.
सध्या भारतात श्वसन संसर्गाच्या प्रकरणांमध्ये लक्षणीय वाढ झालेली नाही.

  या आजारावर उपचार आणि काळजी:-
औषधे:- सध्या या आजारासाठी कोणतीही विशिष्ट लस किंवा अँटीव्हायरल औषध उपलब्ध नाही. उपचार फक्त लक्षणांवर आधारित आहेत.
अँटीबायोटिक्स: हा आजार विषाणूमुळे होतो, त्यामुळे अँटीबायोटिक्स प्रभावी नाहीत. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेणे टाळा.

 तुमच्या आरोग्यासाठी महत्वाचे उपाय:-
खोकताना किंवा शिंकताना तोंड आणि नाक रुमाल किंवा टिश्यूने झाका.वारंवार साबणाने हात धुवा किंवा सॅनिटायझर वापरा.
 ताप, सर्दी किंवा खोकला असल्यास सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळा.गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा.आजारी लोकांशी जवळचा संपर्क टाळा.डोळे, नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श करणे टाळा.घरातील हवा खेळती राहते याची खात्री करा.भरपूर पाणी प्या आणि पौष्टिक आहार घ्या.

  सार्वजनिक आरोग्य व्यवस्था सज्ज:-
पुणे येथील राष्ट्रीय विषाणू संस्था (एनआयव्ही) येथे संशोधन सुरू आहे.
सर्व सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांच्या रुग्णालयांमध्ये औषधांचा मुबलक साठा उपलब्ध आहे.
 आरोग्य केंद्रांमध्ये तात्काळ उपचारांसाठी योग्य व्यवस्था करण्यात आली आहे.
     डॉ. राठोड यांचा नागरिकांना संदेश: - “आरोग्य ही आपली जबाबदारी आहे. घाबरण्याचे कारण नाही, फक्त काळजी घ्या.”
“अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहिती घ्या. स्वच्छता आणि आरोग्य हे संसर्ग टाळण्यासाठी प्रभावी साधन आहे.”
 मुले, वृद्ध आणि कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्या व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी. लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या असा सल्ला दिला आहे