शहादा दि १२ (प्रतिनिधी) सरदार पटेल ज्येष्ठ नागरिक मंडळाची द्विमासिक बैठक गांधीनगर येथे गांधी हॉलमध्ये घेण्यात आली बैठकीचे अध्यक्षस्थान सतीश सोनवणे यांनी भूषविले. अनुमोदन पुंडलिक तांबोळी यांनी दिले.सर्वांनी खरा तो एकची धर्म ही प्रार्थना सामुदायकरीत्या म्हटली. व्यासपीठावर सतीश सोनवणे डी एच आप्पासाहेब पाटील ऍड.गोविंद विठ्ठल पाटील,मंडळाचे माजी अध्यक्ष गोविंदभाई गोपाळ पाटील हे विराजमान होते. या सर्वांनी सावित्रीबाई फुले,राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार व पुष्प टाकून पूजन केले.
समाजातील दिवंगत व्यक्ती महापुरुष, राष्ट्रपुरुष, शहीद जवान सभासदांचे नातेवाईक जे दिवंगत झाले त्यांना दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. संस्थेचे सचिव आनंदराव विसपुते यांनी मागील सभेचे कार्यवृत्त व जमाखर्चाचे वाचन केले. सभासदांनी त्या खर्चास मान्यता दिली. या महिन्यात डी.एच.अप्पा पाटील,निवृत्त मुख्याध्यापक नगीनभाई पाटील, धनसुकलाल देसाई,जे डी पटेल सर,मोहन पाटील शिवदास पाटील आनंदराव विसपुते,या सभासदांचा वाढदिवस असल्याने त्यांना श्रीफळ गुलाबपुष्प व नॅपकिन देऊन सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ नागरिक शहादा तालुका अध्यक्ष जे.डी पटेल सर यांनी आपले जीवन, राष्ट्रपुरुषांचे अलौकिक कार्य, परिवारात संस्कृतीची पेरणी करण्याचे, उत्तम राष्ट्रभक्ती यावर विवेचन केले ग्रंथालयाची कास धरून वाचन करणाऱ्यांची संख्या वाढावी. आजचा तरुण सुसंस्कृत निर्धार असे सांगितले.फेस्कॉम
प्रसिद्धी प्रमुख डि.जी.पाटील यांनी ज्येष्ठ नागरिकांनी एकत्र येऊन मानवतावाद विज्ञान वाढ याचे विवेचन केले. हिरालाल बोरदेकरांनी मंडळ भविष्यात उंच करण्यासाठी सर्वांनी हातभार लावावे असे आवाहन केले. अध्यक्ष भाषणात सतीशनाना सोनवणे यांनी उंचावर नेण्यासाठी व समाजात सुसंस्कार करण्यासाठी जेष्ठांनी कार्य करावे. असे विचार मांडलेत. उपस्थित सभासदांचे आभार पुंडलिकनांना तांबोळी यांनी मानलेत. या कार्यक्रमासाठी सखाराम पाटील,ऍड.गोविंद पाटील,सुरेश चौधरी, पुंडलिक तांबोळी,डी.एच.अप्पा पाटील,जगन्नाथ पाटील, कोमलसिंग गिरासे,उद्धव पाटील, नगीनभाई पाटील, नरोत्तम पाटील,रतिलाल पाटील, भीमभाई पाटील, रघुनाथ पाटील,विवेक पाटील, महेंद्र सोनार,मोहन पाटील,डी जी पाटील सर, गिरीश पारेख,शिवदासभाई पाटील, खुमानसिंग गिरासे, सुरेश छाजेड,बनेचंद जैन,राजेंद्र साळी. इ,सभासदांनी कार्यक्रमास उपस्थित राहून विशेष परिश्रम घेतले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप झाला.