Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

अनिद्या कोचिंग इंस्टिट्यूट आणि शौर्य बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने गरीबांच्या संक्रांतीत गोडवा आणला

सातपुडा मिरर न्युज नेटवर्क दि १४ 
समाजसेवेचा वसा अंतःकरणात जागवुन, वस्तीतील चिमुकल्यांचा आयुष्यात गोडवा निर्माण करण्यासाठी,मकर संक्रांतीच्या पवित्र निमित्ताने
 अनिद्या कोचिंग इंस्टिट्यूट आणि शौर्य बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आकाराची भट्टी, पाताच पाणी, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, जानूपाडा, जवळ कांदिवली येथे भोजन वितरण आणि वस्त्र वितरणाचा कार्यक्रम आयोजित केला आहे.
      संस्थेच्या वतीने चला, एकत्र येऊ आणि हा सण आनंदाने व उत्साहाने साजरा करूया, घोषणा देत,तसेच समाजसेवेचे प्रतीक बनवूया.
यावेळी गरजु गरीब रहिवासी यांची परिस्थिती जाणून घेत भविष्यात येणाऱ्या अडचणी व आरोग्य सेवेविषयक अडचण, वैद्यकीय खर्चासाठी आवश्यक ती मदत व पाठपुरावा करण्यासाठी डॉ. छाया भटनागर (9755507890) किरण संपत साळवे (99200 71479) यांनी आश्वस्त केले आहे.व संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.