Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

३२ व्या राष्ट्रीय आदिवासी सांस्कृतिक एकता परीषद संमेलनाची जय्यत तयार ीसंमेलनात ८ ते १० लाख आदिवासी बांधव उपस्थिती

साक्री दि ११(प्रतिनिधी) ३२ व्या राष्ट्रीय आदिवासी सांस्कृतिक एकता परीषद  संमेलनाची जय्यत तयारी
संमेलनात ८ ते १० लाख आदिवासी बांधव उपस्थित राहणार असल्याचा अंदाज आयोजकांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
     आदिवासी समाजाला आधुनिकतेचा दर्प आला आहे. अशा परिस्थितीत धर्म संस्कृतीचा प्रभाव याची आठवण करून देण्यासाठी श्रम,समूह आणि सहकार्यावर हा समाज आधारित आहे, समता बंधुता यावी यासाठी १९९४ साली अक्कलकुवा तालुक्यातील अंकुश विहीर येथे पहिली आदिवासी एकता परिषद, महासंमेलन संपन्न झाली होती,
 तेव्हाच संस्कृती मूल्य संवर्धनासाठी आदिवासी बांधवांनी एकत्र आले पाहिजे म्हणून परिषदेचे गठन झाले असे मौल्यवान प्रतिपादन संमेलनाचे प्रमुख लेखक, साहित्य कवी वाहरू सोनवणे यांनी व्यक्त केले.यावेळी बागलाण चे आमदार दिलीप मंगळु बोरसे.शिवसेना धुळे जिल्हा अध्यक्ष डॉक्टर तुळशीराम गावीत प्रविण बापु चौरे सह प्रतिभा चौरे देशमुख सह सर्व मान्यवर उपस्थित होते 
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रेमचंद सोनवणे यांनी केले, तर तुकाराम बहिरम यांनी  सूत्रसंचालन केले. संमेलनाचे संयोजक डोंगर बागुल, डॉ. शांतीकर वसावा, भूपेंद्र भाई चौधरी, पंचक्रोशीतील विविध गावचे सरपंच, उपसरपंच, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र व दादरा नगर हवेली येथील प्रतिनिधी उपस्थित होते. पत्रकार परिषदेसाठी मांगीलाल गांगुर्डे गणेश गावित, श्रीमती प्रतिभा चौरे, प्रवीण चौरे, अजय राऊत, इंजिनिअर भोये रावसाहेब, अनिल गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.  या संमेलनात साहित्यिक, युवा मंच, महिला मंच, बालकलाकारांसाठी सांस्कृतिक मेळावा घेतला जाणार आहे. कार्यक्रमांची सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. नामांकित १०० कवी, लेखक साहित्यिक सहभागी होणार आहेत. भोजन व्यवस्था गुजरात येथील टीम यांचेकडे आहे १३, १४, १५ जानेवारी २०२५ या तीन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन आहेत.
पत्रकार परिषदेसाठी पत्रकार संघाचे अध्यक्ष सुभाष जगताप जेष्ठ पत्रकार प्रा एस डी पाटील सह प्रिंट मीडिया व इलेक्ट्रॉनिक मिडिया चे सर्व पत्रकार आदि उपस्थित होते.