Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

राजस्थानी ब्राम्हण समाज, नंदुरबार यांच्या वतीने देवरे विद्यालयातील विद्यार्थ्यांना ब्लॅंकेटचे वाटप

राजस्थानी ब्राम्हण समाज, नंदुरबार यांच्या वतीने देवरे विद्यालयातील विद्यार्थ्यांना ब्लॅंकेटचे वाटप 
नंदुरबार दि ११(प्रतिनिधी) तालुक्यातील श्री. धंगाई विधायक कार्य मंडळाचे श्री. आप्पासाो. आत्माराम धवळू देवरे माध्यमिक विद्यालय विखरण येथे नंदुरबार येथील समस्त राजस्थानी ब्राम्हण समाजातर्फे विद्यालयातील होतकरू,गरीब व गरजु विद्यार्थ्यांना थंडीपासून संरक्षण व्हावे या उद्देशाने उबदार ब्लॅंकेटचे वितरण करण्यात आले.
    कार्यक्रमाचे प्रास्ताविक,ब्राह्मण समाजाचे उद्देश व कार्य याचे संक्षिप्त नंदुरबार येथील राजस्थानी ब्राम्हण समाजाचे अध्यक्ष, रो.अनिल शर्मा यांनी केले.कार्यक्रमाला उपस्थित जेष्ठ नागरिक मोहन शर्मा,उद्योजक राजेंद्र शर्मा,सचिन शर्मा,राजेश शर्मा, युगल शर्मा यांना विद्यालयाचे मुख्याध्यापक डी.डी.साळुंके यांनी स्वागत व सन्मानित केले.गरीब,गरजु व होतकरू विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते ब्लॅंकेटचे वितरित करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डी.बी. भारती तर आभार एम.डी.नेरकर यांनी मानले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी उपशिक्षक वाय.डी.बागुल,व्ही.बी.अहीरे,डॉ.आर.आर.बागुल,
एस.एच.गायकवाड,एम.एस.मराठे,ए.एस.बेडसे,डी.बी.पाटील,एच.एम.खैरनार,एस.जी.पाटील यांनी परिश्रम घेतले.