Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

अफार्म संस्थे मार्फत शेतकरी यांना प्रत्यक्षिक द्वारे पाणी व्यवस्थापन, कृषी व पशुधन,यावर शेतात मार्गदर्शन

अफार्म संस्थे मार्फत शेतकरी यांना प्रत्यक्षिक द्वारे पाणी व्यवस्थापन, कृषी व पशुधन,यावर शेतात मार्गदर्शन

नंदुरबार दि २१(प्रतिनिधी) जिल्ह्यातील पाणी व्यवस्थापन, कृषी व पशुधन विकास, आरोग्य, शिक्षण आणि उद्योजकता विकास या बाबींवर काम करून समस्या निरसन करण्यासाठी या पाच स्तंभावार उभारलेला ‘एकात्मिक ग्रामीण विकास प्रकल्प’ अंबलबजावणीचा निर्धार अर्थसाहाय कमिन्स इंडिया फाउंडेशन व अंमलबजावणी अफार्म संस्थेने घेतला. प्रकल्प अंबलबजावणीसाठी नंदुरबार तालुक्यातून १४ गावांचा प्रकल्पात समावेश करण्यात आला. सन २०२३ मध्ये प्रकल्पाला सुरुवात केली असून प्रथम वर्षी क्लस्टर १ मध्ये जळखे, रनाळे खु, काळंबा, वडझाकण, पावला, कोठडे व वाघसेपा तसे सन २०२४ मध्ये क्लस्टर २ खैराळे, वाघाळे, सुतारे, हरिपूर, अजेपूर, श्रीरामपूर व नवागाव संबंधित गावातील लोकसहभागाच्या माध्यमातून हवामान अनुकूल शेती व पशुधन व्यवस्थापन, पिण्याचे व सिंचनाचे स्त्रोत बळकटीकरण, आरोग्याच्या व शिक्षण गरजा अभ्यासून त्यावरील उपाययोजना प्रकल्प नियोजनात अंतर्भुत केल्या आहेत. अफार्म संस्थेमार्फत राबविण्यात येत असलेल्या ”एकात्मिक ग्रामीण विकास प्रकल्प, नंदुरबार” अंतर्गत मृदा व जलसंधारण, सुष्म सिंचन, शेती पिक उत्पादकता, उपजीविका विकास कार्यक्रम, प्रशिक्षण व क्षमता बांधणी या सर्व घटकावर प्रकल्पात कामे केली जात आहेत. त्या अनुषंगाने कृषकांचे शेतातील उत्पादकता वाढवून उत्पादन खर्च कमी करण्याच्या दृष्टीकोनातून ‘एकात्मिक रोग व किड व्यवस्थापन’ या विषयी शेतकरी क्षेत्रीय दिन (सत्र दोन) नंदुरबार मधील गाव अजेपूर येथे घेण्यात आले.

            कमिन्स इंडिया फाउंडेशन व अफार्म मार्फत रब्बी हंगामासाठी शेतकरी क्षेत्रीय दिन आयोजित करण्यात आला. प्रकल्पाअंतर्गत शेतकरी क्षेत्रीय दिनात ,एकात्मिक रोग व किड व्यवस्थापन’ विषय केद्रस्थानी ठेऊन काही ठळक विषयांवर सविस्थर मार्गदर्शन करून जसे की कमी खर्चात जास्त उत्पादन, गहू, मका, हरबरा व कांदा लागवड विषयी माहिती. माती परीक्षणाची गरज व महत्व, हवामान अंदाज उपयुकता. शेतकरी क्षेत्रीय दिन महत्व व गरज.सूक्ष्म अन्न्द्रवे व खत व्यवस्थापन. सेंद्रिय शेती महत्त्व/ सेंद्रिय निविष्टा विषयी माहिती - लमित आर्क, दशपर्णी अर्क व जीवामृत प्रात्यक्षिक. सध्याच्या पिक परिस्थितीनुसार समस्या समजून घेणे व उपाय योजना करणे. सध्याच्या पिक परिस्थितीनुसार हवामान अनुकूल शेती तंत्राबाबत मुख्य पिकांची माहिती देणे, त्याआधारे पिकांचे नियोजन करणे. मातीची सुपीकता वाढण्यासाठी अल्प खर्चिक तंत्रे – हिरवळीची खते, जीवाणू खाते, गांडूळ खत, व जीवामृत. कीड व रोग नियंत्रणा संदर्भात आर्थिक नुकसान पातळी मोजण्याचे प्रात्येक्षिक करणे – पक्षी थांबे, पिवळे चिकट सापळे, कामगंध सापळे, खत व्यवस्थापन इ. विषयी माहिती देण्यात आली.

या वेळी श्री.रोहित लोहार(कृषि विस्तार अधिकारी अफार्म), कृषितज्ज्ञ योगेश पाटील, कृषिमित्र डोंगरसिंग जगताप, पशुसेवक पुनाजी साबळे, सरपंच, पोलीस पाटील व शेतकरी उपस्थित होते.  

छायाचित्र – रोहित लोहार (कृषि विस्तार अधिकारी)

1. जीवामृत प्रत्येक्षित दाखवताना.
2. पिवळे चिकट सापळे, कामगंध सफाळे, औषधाचे वितरणाचे छायाचित्र.
3. शेतकरी यांना मार्गदर्शन करताना.