निवेदनात नंदुरबार जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वर्षा लहाडे यांच्या एकाधिकार, मनमानी, हुकूमशाही पद्धतीने त्यांच्याच लेव्हलच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना अरेरावी करून अपमानीत करने तसेच प्रत्येक कामाकरिता मोठ्या प्रमाणात आर्थिक देवाण घेवाण , भ्रष्टाचार केल्याच्या बाबतीत अधिकारी,कर्मचारी सामाजिक संघटनांनी दिनांक 10 जानेवारी 2025 रोजी आपल्याकडे तक्रारी, निवेदने दिली होती, त्याच्या प्रति मा. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री साहेब, आरोग्य मंत्री, आदिवासी विकास मंत्री,मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य, मुंबई तसेच आरोग्य सेवेच्या सर्व अधिकाऱ्यांना पाठविण्यात आल्या होत्या. त्यामुळे मा.उपसंचालक, आरोग्य सेवा,नाशिक मंडळ, नाशिक
यांनी दिनांक -17 जानेवारी 2025 रोजी चौकशी समिती गठीत करून नंदुरबार येथे तक्रारदार सामाजिक संघटना, कर्मचारी, अधिकारी संघटना आणि अन्यायग्रस्थ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कमिटीने प्रत्यक्ष चौकशीत डॉ. वर्षा लहाडे यांच्या विरोधात विशेष करून आर्थिक देवाण घेवाण केल्याचे पुरावे, ऑनलाईन ट्रांजेक्षन झाल्याचे स्क्रिनशॉट देऊन दिनांक 17 जानेवारी 2025 रोजी 12 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत जवळ जवळ 50 अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पुरावे सादर करून आप आपले जबाब सादर केलेत. आम्हीं सदर कमिटीला विनंती केली होती की, इमरजेन्सी ड्युट्या असल्याने भरपूर कर्मचारी,अधिकारी हजर होऊ शकले नाहीत. त्यामुळे आपण अजुन एक दिवस थांबून घ्यावेत व निपक्ष, नैसर्गिक चौकशी व्हावी यासाठी डॉ. वर्षा लहाडे यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात यावेत समितीला लेखी देखील निवेदन दिले होते आणि तळोदा किंवा अक्कलकुवा या ठिकाणी जाऊन मोलगी, धडगावा येथील कर्मचाऱ्यांना बोलावून ज्यांना येता आले नाहीत ते बरेच कर्मचारी जबाब देऊ शकतील...!
परंतु कमिटीला चौकशी साठी 7 दिवसांची मुदत दिली असतांना फक्त 5 तास चौकशी करून समितीचे सदस्य नाशिक येथे निघून गेलेत, दुसऱ्या दिवासा पासून डॉ. वर्षा लहाडे या तळोदा, अक्कलकुवा तसेच जिल्ह्या रुग्णालय नंदुरबार येथील वार्डात जाऊन अधिकारी आणि स्टाफ कर्मचाऱ्यांना दम, दादागिरी, अरेरावी करून सांगत आहेत की, ज्यांनी ज्यांनी माझ्या विरोधात तक्रारी करून जबाब लिहून दिलेले आहेत, त्यांनी पुन्हा माझ्या समर्थनात जबाब लिहून द्या नाही तर तुमचे CR खराब करून तुम्हांला निलंबीत, बडतर्फ करेन अशा प्रकारे ऑफिस मध्ये बोलावून फोन करून त्रास दिला जात आहेत. त्यामुळे रुगणसेवेवर देखील परिणाम होत आहेत. जिल्ह्यातील सर्व ग्रामीण उपजिल्हा रुग्णलायातील अधिकारी, कर्मचाऱ्यांत दहशत, भीती निर्माण झाली आहे.
वास्तविक डॉ. वर्षा लहाडे, नंदुरबार जिल्हा शल्यचिकित्सक यांच्यावर आर्थिक देवाण घेवाणचे गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आल्यामुळे शासनाने निपक्षपातीपणे चौकशी करावी यासाठी त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवून चौकशी कमिटीने चौकशी करने अपेक्षित होते. परंतु तसे न करता चौकशी कमिटीला 7 दिवसांची मुदत दिली असतांना फक्त 4 ते 5 तासातच चौकशी आटोपून कमिटीने चौकशी केल्याची एक नौटंकी केल्याचे दाखविले आणि ज्या अधिकारी,कर्मचाऱ्यांनी डॉ. वर्षा लहाडे यांच्या विरोधात जबाब लिहून दिलेत नेमके दुसऱ्या दिवसापासुन त्याच कर्मचारी, अधिकाऱ्यांना दमबाजी केल्या जात आहेत. यामुळे चौकशी कमिटीनेच डॉ. वर्षा लहाडे यांना कोणी कोणी जबाब लिहून दिले? त्याची माहिती पुरवली तर नाहीना अशी शंका निर्माण झाली असून एक प्रकारे चौकशी कमिटी, आरोग्य खात्याचेच वरिष्ठ अधिकारी आणि स्थानिक व राज्य सरकारचे शासन प्रशासन देखील डॉ. वर्षा लहाडे यांना पुरावे नष्ट कारण्याची संधी तर देत नाहीत ना? अशी शंका निर्माण झाली असल्याने जर राज्य सरकारने डॉ. वर्षा लहाडे यांना सक्तीच्या रजेवर पाठवून त्यांच्यावर जिल्हा बदली व त्यांनी केलेल्या आर्थिक देवाण घेवाण याची सखोल चौकशी व्हावी यासाठी चौकशी कमिटीने तात्काळ पुन्हा उर्वरित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे जाब जबाब घेण्यात येऊन निपक्षपाती, नैसर्गिक न्याय देण्यात यावेत आणि डॉ. वर्षा लहाडे, जिल्हा शल्यचिकित्सक, नंदुरबार याची जिल्हा बदली तसेच त्यांनी केलेल्या आर्थिक देवाण घेवाण याची सखोल चौकशी होऊन बडतर्फ तसेच त्यांच्यावर स्त्री भ्रूण हत्या सारखा गंभीर स्वरूपा सारखा गुन्हा केल्याचा आरोप असल्याने न्यायालयात केस सुरु असतांना त्यांना आदिवासी बहुल जिल्ह्यात जिल्हा शल्यचिकित्सक या पदावार नियुक्ती कोणी व का दिली याची देखील चौकशी होऊन संबंधितांवर कडक कार्यवाही झाली पाहिजे, नाहीतर नाईलाजाने सामाजिक संघटना आणि आरोग्य खात्याच्या सर्व अधिकारी, कर्मचारी संघटना आणि सर्व कर्मचाऱ्यांना आपल्या कार्यालयासमोर *दिनांक- 24 जानेवारी 2025 पासून बेमुदत धरणा प्रदर्शन करण्यात येईल व जिल्ह्या शासन प्रशासन यांनी दखल न घेतल्यास पुढील आंदोलन आझाद मैदान, मुंबई येथे करण्यात येईल आणि होणाऱ्या परिणामांना राज्य शासन, प्रशान जबाबदार राहील याची नोंद घ्यावी.निवेदनाचा प्रती
माहितीसाठी प्रत सादर
1) मा. मुख्यमंत्री सो. महाराष्ट्र राज्य, मुंबई
2) मा. उपमुख्यमंत्री सो. मुंबई.
3) मा. आरोग्य मंत्री सो. मुंबई.
4)मा. श्री टी. सी. बेंजामीन,
अप्पर मुख्य सचिव (आरोग्य व कुटुंब कल्याण )सर्वजनिक आरोग्य विभाग, मुंबई
5) श्रीमती मिता आर. लोचन, सचिव (आरोग्य व कुटुंब कल्याण )
सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र.
6) मा. उपसंचालक, आरोग्य सेवा मंडळ, नाशिक.