Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

जी.टी.पाटील महाविद्यालयात ई - कचरा जनजागृती व संकलन कार्यक्रमाचे उद्घाटन

नंदुरबार दि २०(प्रतिनिधी) येथील जी.टी.पाटील महाविद्यालयात नंदुरबार डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंट कौन्सिल तसेच पूर्ण इकोव्हीजन फाउंडेशन पुणे व राष्ट्रीय छात्र सेना याचबरोबर कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग व एन्व्हायरमेंट क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने ई कचरा जनजागृती व संकलन कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य तथा विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ.एम.जे.रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी महाविद्यालयाच्या विद्यार्थी तसेच स्वयंसेवकांकडून जास्तीत जास्त ई कचरा मोहीम लोकांपर्यंत पोहोचवणे व संकलन करण्याचे अपेक्षा व्यक्त केली. 
या कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे समन्वयक डॉ.एम.एस.रघुवंशी, नंदुरबार डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंट कौन्सिलची समन्वयक आशिष वाणी, व्यवस्थापक श्रीराम दाऊतखाने, उपप्राचार्य एस.यु. पाटील, उपप्राचार्य डॉ. एस.पी.पाटील, अंतर्गत गुणवत्ता विभागाचे प्रमुख डॉ एम आर पाटील, कुलसचिव सुदेश रघुवंशी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. 
या कार्यक्रमाचा उद्देश निरुपयोगी अथवा चालू स्थितीमधील कोणतीही इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू यांचे संकलन करणे. लोकांमध्ये ई कचरा म्हणजे नेमकं काय? आणि पर्यावरणाला याची कशी हानी पोहचू शकते. याविषयीची जनजागृती करणे हा आहे. दिनांक 26 जानेवारी 2025 पर्यंत ई-कचरा संकलित केला जाणार आहे.या कार्यक्रमाचे आयोजन संयोजन डॉ.अनिल कुलकर्णी, लेफ्ट.डॉ.व्ही. झेड. चौधरी, डॉ.मनोज शेवाळे, डॉ. दिनेश देवरे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी राष्ट्रीय छात्र सेना व राष्ट्रीय सेवा योजना विभागातील स्वयंसेवक यांनी परिश्रम घेतले. 
कार्यक्रमास बहुसंख्य प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.