(Nandurbar)
नंदुरबार दि १९(नंदुरबार)अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेचे अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषदेचे सदस्य,"केमिस्ट हृदयसम्राट आप्पासाहेब जगन्नाथजी शिंदे " यांच्या अमृतमहोत्सवी जन्मदिनानिमित्त महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषदेच्या (MSPC) औषध माहिती केंद्राच्या (DIC) माध्यमातून "निरंतर शिक्षण प्रणाली" (CEP) अंतर्गत संपुर्ण महाराष्ट्रात ७५+ कोर्स घेण्याचा संकल्प घेण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषदेचे अध्यक्ष "सन्मा. श्री. अतुल भाऊ अहिरे", औषध माहिती केंद्राचे प्रमुख "सन्मा. श्री. गणेशजी बंगळे", तसेच महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषदेची पुर्ण टिमने नियोजनात्मक पद्धतीने संपुर्ण महाराष्ट्रात सर्वच्या सर्व ३६ जिल्ह्यात आज दि. १९/०१/२०२५ (रविवार) रोजी [एकाच दिवशी एकाच वेळी] ४४+ कोर्स घेऊन विक्रम प्रस्थापित केला आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटनपर सत्र दुरभाष यंत्रणेच्या माध्यमातून आभासी पद्धतीने करण्यात आले.
"आदरणीय आप्पासाहेब जगन्नाथजी शिंदे" यांनी मौलिक मार्गदर्शन करुन औपचारिक दृष्ट्या उद्घाटन केले.
महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषदेच्या निबंधक (रेजिस्टार) सौ. सायली मसाळ मॅडम, महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषदेचे उपाध्यक्ष श्री. धनंजय भाऊ जोशी, औषध माहिती केंद्राचे प्रमुख श्री. गणेशजी बंगळे, कौन्सिलचे माजी अध्यक्ष श्री. विजय दादा पाटील, महाराष्ट्र राज्य केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे मानद सचिव श्री. अनिलजी नावंदर, महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषदेचे अध्यक्ष श्री. अतुल भाऊ अहिरे यांनी दृकश्राव्य माध्यमातून मार्गदर्शन केले.
नंदुरबार येथील हिरा एक्झिक्युटिव्ह हॉटेल मध्ये नंदुरबार जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या सहकार्याने नंदुरबार महानगर व नंदुरबार तालुका तालुक्यातील केमिस्ट/फार्मासिस्ट बंधू व भगिनींसाठी "फार्मसी मॅनेजमेंट कोर्स" ह्या एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
ह्या कार्यक्रमाला "डॉ.श्री.प्रशांत आरगाळे सर" ( जळगाव) व "डॉ.श्री.कुलदीप बनसोळ" (जळगाव ) यांनी मार्गदर्शन केले.
नंदुरबार जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे कोषाध्यक्ष दिनेश जेठमल जैन यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा संघटनेचे सहसचिव देवेंद्र गुरव तसेच जिल्हा संघटनेचे सदस्य ललित छाजेड ,विवेक पाटील, मोतीलाल जैन, सुलेमान मणियार, इम्रान मकरानी, शहाजेब सय्यद नंदुरबार तालुका अध्यक्ष महेश राजपूत ,तसेच अतुल अहिरराव तळोदा तालुका अध्यक्ष नचिकेत पिंपरे नवापूर तालुका अध्यक्ष तुषार मराठे अक्कलकुवा तालुका अध्यक्ष एजाज भाई काजी ऋषभ जैन तसेच सेंट्रल झोन सहसचिव राजेंद्रजी डागा यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले