जीवनात यशस्वी झालेल्या माणसाने नेहमीच समाजाप्रती व शाळेप्रती आपण काहीतरी देणे लागतो ही भावना जोपासलेली असते. त्यामुळे अनेक जण शाळेला तसेच विविध सामाजिक कार्यासाठी हातभार लावत असतात. याच भावनेने प्रेरित झालेले मोड येथील कॉम्रेड बीटीआर हायस्कूलचे माजी विद्यार्थी व कॅनडा येथे नोकरीनिमित्त स्थायिक झालेले अनिवासी भारतीय राजेंद्र जगन मराठे(माने) यांनी शाळेला मोठ्या क्षमतेची साऊंड सिस्टिम भेट दिली तसेच प्रत्येक क्लासरूमसाठी पंखे भेट दिले.राजेंद्र याने आपले इयत्ता ५ ते १० वीपर्यंत चे शिक्षण मोड येथील कॉ. बी.टी.आर.हायस्कूलमध्ये झालेले आहे. येथे झालेल्या शैक्षणिक संस्कार व प्रगतीमुळेच मला ही झेप घेतली असल्याचे त्याने आपल्यामनोगतात सांगितले.शाळेतील विद्यार्थ्यांचा प्रगतीत खारीचा वाटा म्हणून ही भेट व शाळेचा संस्काराप्रती उतराई होण्याचा छोटासा प्रयत्न असल्याचे त्याने सांगितले.यावेळी त्याने उपस्थित विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्व पटवून दिले.ही भेट २६ जानेवारी प्रजा5सत्ताक दिनाचे औचित्य साधत अंबरसिंग महाराज ज्ञान विज्ञान शैक्षणिक प्रसार मंडळाचे अध्यक्ष मंगलसिंग चव्हाण यांच्या कडे राजेंद्र मराठे यांनी सुपूर्द केली. यावेळी संस्थेचे संचालक ईश्वर पाटील , ज्येष्ठ कार्यकर्त्या तापीबाई माळी ,ज्येष्ठ नागरिक ब्रिजलाल मराठे ,शाळेचे मुख्याध्यापक आय.जी. पिंजारी,दयानंद चव्हाण व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी शाळेतर्फे राजेंद्र मराठे यांच्या सत्कार करण्यात आला.तत्पूर्वी प्रजासत्ताक दिनाचे ध्वजारोहण संस्था अध्यक्ष अध्यक्ष मंगलसिंग चव्हाण यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी शिक्षक राजेंद्र मगरे ,सुनील लाडे ,संदीप पाटील, चंद्रकला वसावे ,गीतांजली मराठे ,पुष्पांजली मराठे ,वर्षा माळी तसेच शिक्षकेतर छाया वळवी ,बापू कोळपे ,मंगल जाधव ,आया ठाकरे व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फुंदीलाल माळी यांनी केले.
शाळेबद्दलचा आपुलकीतुन अनिवासी भारतीय विद्यार्थ्यांने शाळेला स्मरणात राहतील अशी वस्तूरुपी भेट दिली
January 30, 2025
तळोदा दि ३०(प्रतिनिधी) कॅनडा येथे स्थायिक झालेल्या अनिवासी भारतीय राजेंद्र जगन मराठे(माने) रा. मोड ता.तळोदा याने येथील कॉ. बी.टी.आर. हायस्कूल या शाळेला साऊंड सिस्टिम व पंखे भेट दिले. २६ जानेवारीचे औचित्य साधत शाळेसाठी आपण काहीतरी देणे लागतो या भावनेतुन विद्यार्थ्यांना लागणारी साऊंड सिस्टिम भेट व पंखे भेट दिल्याने माजी विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात येत आहे.