Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने अजमेर शरीफ दर्ग्यावर चढवण्यसाठीा चादरला उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा हाताचा स्पर्श करून अजमेर रवाना

सातपुडा मिरर न्युज नेटवर्क दि ७ मुंबई 
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने अजमेर शरीफ दर्ग्यावर चढवण्यात येणारी चादर घेऊन पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आमेर जेतपुरवाला आणि इतर पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. 
        राजस्थानच्या अजमेर येथील ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती यांच्या कबरीवर दरवर्षी जगभरातील विविध धर्माचे लोक मोठ्या श्रद्धेने चादर चढवतात. यंदा या उरुसाचे ८१३ वे वर्ष असून दरवर्षीप्रमाणे यावर्षीही पक्षाच्या वतीने अजमेर शरीफ दर्ग्यात चादर चढवली जाणार आहे. या चादरीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा हात लावून ती मोठ्या श्रद्धेने अजमेरकडे रवाना करण्यात आली.