मशरूम शेतीचे मार्गदर्शक राजेंद्र वसावे यांच्या मार्गदर्शनाखाली मशरूम शेतीचे प्रशिक्षण घेण्यात आले.
अलीकडच्या काळात मशरूम शेती ही एक फायदेशीर आणि वेगाने वाढणारी शेती आहे. लोकांना आरोग्यदायी आणि पौष्टिक आहाराचे महत्त्व समजले आहे. त्यामुळे मशरूमला खूप चांगली मागणी आहे मशरूम मध्ये प्रथिने जीवनसत्वे आणि खनिजे मुबलक प्रमाणात असतात त्यामुळे ती अत्यंत लाभदायक ठरतात मशरूम शेतीसाठी कमी जागा आणि कमी गुंतवणुकीची गरज असते त्यामुळे ही शेती लहान आणि मध्यम शेतकऱ्यांसाठी अत्यंत योग्य आहे यासाठी विशेष उपकरणांची आवश्यकता नसल्यामुळे कुठल्याही प्रकारच्या जागेत किंवा घराच्या एका कोपऱ्यातही मशरूम शेती सुरू करता येते त्या अनुषंगाने मौजे टेकवाडे येथील आत्मा योजनेअंतर्गत स्थापित झालेल्या महिला बचत गटांना छोट्या मोठ्या प्रमाणावर व्यवसाय सुरू करण्याच्या दृष्टीने मशरूम शेतीचे प्रशिक्षण घेण्यात आले.
प्रशिक्षणात मशरूम शेतीचे मार्गदर्शक राजेंद्र वसावे यांनी गटातील शेतकऱ्यांना मशरूम शेती बद्दल लागणारी जागा, पाणी व्यवस्थापन, कच्चामाल, बियाणे, वातावरण, आद्रता कशी स्थिर ठेवता येईल व मशरूम निघून संपल्यानंतर सेंद्रिय खत कसं तयार केले जातात याबद्दल मार्गदर्शन केले.
लिलाताई वसावे यांनी मशरूम शेतीचे प्रात्यक्षिक करून दाखविले.मशरूम शेतीचा व्यवसाय तसेच विपणन कसे करता येईल याबद्दल मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमात मशरूम शेती करणारे शिरपूर तालुक्यातील सटीपाणी गावातील मशरूम उत्पादक राकेश पावरा यांनी आपला अनुभव या कार्यक्रमात उपस्थितांना सांगितले की माझे भाऊ डॉ.रवींद्र पावरा MBBS हे राजेंद्र वसावे यांच्याकडून प्रशिक्षण घेतले होते व वेळोवेळी मार्गदर्शन घेतल्याने आमच्या गावात मशरूम शेतीचे कार्यक्रम राबवण्यात आला होता. मी व माझ्या परिवार स्वखर्चाने पॅक हाऊस तयार केला आहे त्याच्यात आतापर्यंत चाळीस हजार रुपये पर्यंत एक ते दीड महिन्याच्या आत उत्पन्न घेतले आहे व नेहमीप्रमाणे युनिट चालू आहे. महिला व पुरुष वेगवेगळ्या गावातील प्रशिक्षणार्थ्यांना ही माहिती सांगितली.
अतुल बाविस्कर कृषी सहाय्यक यांनी आपल्या घरी सेंद्रिय खते व औषधे कसे तयार केले जातात ते या कार्यक्रमात उपस्थित असलेले प्रशिक्षणार्थ्यांना प्रात्यक्षिक करून दाखवले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रज्ञा मोरे आत्मा गट यांनी केले एन.एम. महाजन मशरूम शेतीचे महत्त्व या विषयावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी शेतकरी सहभागासाठी परिश्रम कृषी सहाय्यक ललित पाटील यांनी केले. व महिला शेतकरी वेगवेगळ्या गावातील मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.