Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

शहादा येथील दिपाली चित्ते खुन- प्रकरणी हिंदू राष्ट्र सेना मैदानात, सीबीआय चौकशीची मागणी

तळोदा ( प्रतिनिधी) शहादा येथील पोलीस स्टेशन हद्दीत मलोनी गावा अंतर्गत जनजातीचा महिलेवर घडलेला अत्याचार व खुन या संदर्भात दोषींवर कडक कारवाई करावी यासाठी हिंदु राष्ट्र सेना तर्फे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
       निवेदनाचा आशय असा, तळोदे शहरातील मुळ रहिवासी असुन तळोदे शहर व परिसरात सनदशीर व शांततेच्या वातावरणात राहतो. शहादे तालुक्यातील मैलोनी मौज येथे गेल्या आठवडयात अनुसुचित जमातीतील महिलेवर अत्याचार होऊन प्रशासनाने व पोलीस विभागाने त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे व घटनेच गांभीर्य न पाळल्यामुळे केवळ किरकोळ स्वरुपाचा गुन्हा नोंद करुन आरोपीस सहकार्य केलेले आहे. पीडीत अनुसुचित जमातीतील महिलेचे दरम्यानच्या काळात जिव गमवावा लागलेला आहे.
       सदरची घटना ही किरकोळ स्वरूपाची नसुन सदर प्रकरणात मुळा पर्यंत चौकशी करून आरोपी व आरोपींना सहकार्य करणारे यांच्या वर सीबीआय चौकशी करण्यात यावी व सर्वांवरती योग्य ती कायदेशिर कार्यवाही करण्यासाठी निवेदन देत आहोत. शहादे शहर व परिसरात अनुसुचित जमाती महिलांशी अश्या प्रकारचे बाहेरील व्यक्ती येऊन जोरजबरदस्ती व निरनिराळ्या प्रकारचे आमीश दाखवुन भोळ्या भाबडया अनुसुचित जमातीतील महिला त्यास बळी पडता आहे. त्यामुळे सदर गुन्हयाची गांभीर्याने दखल घेत आरोपी विरूद्ध व सहकार्याविरूद्ध अनुसुचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदे देव कलम यांच्या सह इतर भारतीय न्याय संहिता अन्वये कडक कार्यवाही व्हावी. अन्यथा आम्ही खालील सही करणार यांना सनदशीर मार्गाने आंदोलन करणे भाग पडले.असा इशारा दिला आहे.
 निवेदनावर तालुका अध्यक्ष किरण प्रभाकर ठाकरे,
 राहुल जैन, योगेश विनायक चव्हाण,पारस परदेशी,अमन जोहरी आदिंचा सह्या आहेत.