Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

जी टी पाटील महाविद्यालयातील रासेयोचे विशेष हिवाळी शिबिर संपन्न

नंदुरबार दि २७ (ता प्र) जी टी पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष हिवाळी शिबिर दिनांक १९.०१.२०२५ ते २५.०१.२०२५ दरम्यान दत्तक गाव केवढीपाडा येथे आयोजित करण्यात आले. या शिबिराचा समारोप दिनांक २५.०१.२०२५ रोजी महाविद्यालयाचे प्राचार्य तथा कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावचे व्यवस्थापन परिषद सदस्य माननीय प्रा. डॉ. एम.जे. रघुवंशी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. 
       कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून नंदुरबार तालुका विधायक समितीचे समन्वयक प्रा. डॉ. एम. एस. रघुवंशी उपस्थित होते. आपल्या अध्यक्ष भाषणातून श्री रघुवंशी यांनी स्वयंसेवकांना विद्यापीठातर्फे आयोजित विविध शैक्षणिक उपक्रमात सक्रिय सहभागी होण्याचे आवाहन केले तसेच भ्रमणध्वनीचा योग्य वापर करून राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरातून मिळालेल्या संस्कारांचा उपयोग दैनंदिन जीवनात करावा असे नमूद केले. या शिबिरात राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी समाजभिमुख व शाश्वत ग्राम विकासकरिता विविध उपक्रम राबविलेत. यात प्रामुख्याने केवडीपाडा नजीकाच्या शिवण नदीवर एकूण बारा वनराई बंधारे बांधण्यात आलेत. शिबिरादरम्यान जिल्हा सामान्य रुग्णालय नंदुरबार व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने नेत्र व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. यात एकूण ६५ नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला. या शिबिरादरम्यान रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते. यात एकूण २० रक्तदात्यांनी रक्तदान केले. एड्स आजाराविषयी जनजागृती घडवून आणण्याकरिता स्वयंसेवकांनी पोस्टर तयार करून जनजागृती घडवून आणली. वन वनवा या शीर्षकाखाली स्वयंसेवकांनी मौजे अजेपुर येथील नागरिकांमध्ये जनजागृती घडवून आणत जंगल चे महत्व नमूद केले. मतदार जनजागृती पर रॅलीचे आयोजन करत विविध घोषणा देत स्वयंसेवकांनी मतदारांना जागरूक राहून लोकशाही बळकटी करण्याकरिता मतदान प्रक्रियेत सहभागी होण्याचेही आवाहन केले. युवा संवाद, माय भारत नोंदणी, डिजिटल साक्षरता, जल व्यवस्थापन अशा विविध विषयांवर तज्ञ मार्गदर्शकांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले. शिवार फेरीचे आयोजन करत ग्रामीण भागातील संस्कृती व पीक पद्धती विषयी माहिती विद्यार्थ्यांनी मिळवळी. गावातील १०० पेक्षा जास्त घरांना भेटी देत स्वयंसेवकांनी गावाचा सर्वेही केला. समारोप प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा एस यु पाटील, प्रा डॉ. एस पी पाटील, नंदुरबार विभागाचे रासेयो विभागीय समन्वयक प्रा डॉ अमोल भुयार आदी उपस्थित होते. रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा डॉ दिनेश देवरे यांनी प्रास्ताविक तर सहायक कार्यक्रम अधिकारी प्रा जितेंद्र पाटील यांनी सूत्रसंचलन केले. या शिबिराच्या यशस्वी आयोजनाकरिता रासेयो सहायक कार्यक्रम अधिकारी प्रा डॉ सुलतान पवार, महिला कार्यक्रम अधिकारी प्रा डॉ संगीता पिंपरे मुख्याध्यापक श्री एम बी बोराणे व श्री अशोक गवळी व वरिष्ठ स्वयंसेवकांनी परिश्रम घेतलेत.