स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना दिनांक 26 जानेवारी 2025 रोजी गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की मसावद गावातील सत्कार ठाकरे व हिम्मत पावरा हे एका चार चाकी वाहनातून म्हसावद येथून जळगाव मार्गे अकवानी गावी मोहन पटले यांच्याकडे विनापरवाना अवैध दारूची चोटी वाहतूक करणार आहेत. अशी खात्रीशीर गुप्त माहिती मिळाली वरून जिल्हा पोलीस अधीक्षक श्री श्रवण दत्त एस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री हेमंत पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पदकास बातमीची खात्री करून कारवाई करणे कामी सांगितले....
मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक धडगाव पोलीस ठाणे हद्दीतील हातधुई फाटा येथे मध्यरात्री रोडाचे बाजूला दबा धरून बसले असताना काही वेळानंतर एक चार चाकी वाहन समोरून येताना दिसले सदर वाहनावर पोलीस पथकात संशय आल्याने त्यांनी सदर वाहन चालकास हात देऊन थांबवण्याच्या इशारा केला असता सादर वाहन चालकाने वाहन न थांबविता तो पुढे निघून गेला, पोलीस पथकाने लागली सदर वाहनाच्या पाठलाग करून त्यास पुढे थांबविले. तथापि वाहन चालकाने त्याच्याकडील वाहन थोड्या अंतरावर थांबून डोंगर दर्याच्या अंधाराचा फायदा घेऊन तेथून पळ काढला सदर ताब्यातील वाहनाची तपासणी करून एकूण 26 लाख 30 हजार रुपये किमतीच्या अवैध दारू मिळून आला आहे त्यामुळे आरोपींविरुद्ध धळगाव पोलीस ठाणे येथे गु. र. नं. 08/2025 महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 (ई), 108 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्री श्रवण दत्त अपर पोलीस अधीक्षक श्री आशित कांबळे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री हेमंत पाटील पोलीस उपनिरीक्षक मुकेश पवार पोलीस हेडकॉन्स्टेबल रमेश साळुंखे विशाल नागरे मोहन ढमढेरे दीपक न्हावी पोलीस कॉन्स्टेबल अभिमन्यू गावित अशांनी केली आहे